एकदम जुनं

कोरोनापेक्षाही भयंकर परिस्थिती झाली होती 1889 मध्ये, तब्बल एक दशलक्ष लोकांचा घेतला होता जीव…

कोरोना महामारीच्या संकटाला पुढील काही महिन्यात एक वर्ष पुरे होईल तरीदेखील हे संकट शमण्याचे नाव घेत नाही. कोरोनाचा वाढता विस्तार आणि दर मिनिटाला कोरोनाबाधीतांचा आकडा हा गगनी पोहचत आहे. संकट कधी शमेल याची कोणीही शाश्वती देत नाही पण यंत्रणांकडून सर्वतोपरी प्रयत्न हे सुरूच आहेत. कोरोनाने माणसाचे जनजीवन विस्कळीत केले तर देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आणली. तसा, मागच्या काही शतकांचा इतिहास पाहिला तर मानवी तसेच आर्थिक नुकसान होण्याची कोरोना ही काही पहिली वेळ नाही.

इसवी सन 1300 पासून जगाने अनेक महामारी पाहिल्या आहेत, ज्यांनी कोट्यवधी लोकांचा जीव घेतला आणि संपूर्ण जगाला चांगल्या आरोग्याचा सिद्धांत दिली. आपल्या मागील दशकांचा इतिहास पुरावा देतो की, वाईट घटना व कोट्यवधी लोकांचा बळी गेला तरी हे जग पुन्हा नव्याने उभे राहिले आहे. कोरोना महामारीपेक्षाही भयंकर असे अनेक इतिहासातील संकटं आहेत जे आपल्याला माहीत नाही. वंटास मुंबई आज पुन्हा आपल्याला इतिहास सांगत मानवी जीवनातील दुर्बलता आणि सामर्थ्याची भेट घडवून देणार आहे.

“द ब्लॅक डेथ” (1350)

1350 च्या दशकाच्या मध्यात, आशिया आणि युरोपला ब्यूबोनिक नावाचा प्लेग साथीच्या रोगाने हेरले आणि हा रोग  सर्व देशभर पसरला.  या भयानक रोगामुळे युरोपच्या लोकसंख्येच्या तब्बल एक तृतीयांशपेक्षा अधिक लोकांना नष्ट केले! ऑक्टोबर 1347, मध्ये प्लेगने युरोपमध्ये प्रवेश केला, जेव्हा काळ्या समुद्राकडून 12 जहाजे मेसिनाच्या सिसलिनी बंदरावर आली. यावेळी, जहाजातील बहुतेक खलाशी मेले होते आणि जे लोक वाचले ते गंभीरपणे आजारी होते. हे भयाण चित्र पाहून लोक चकित झाले. याच बोटीमुळे हा रोग पसरेल या भीतीने त्यांनी ही “मृत्यूची जहाजे” सिमेबाहेर पाठविण्याचा प्रयत्न केला, परंतु बराच उशीर झाला होता.  हा रोग इतका भयानक आणि व्यापक होता की, सीमेलगत जे लोक रात्री झोपायला गेले होते आणि अगदी निरोगी होते, ते पहाटे मृत्युमुखी पडले होते.

प्लेग (1855)

प्लेग या साथीच्या आजाराने अनेक दशकांत जीवितहानी केली. इतिहासाने या आजाराची मोठी नोंद घेतली आहे. 1855 मध्ये, प्लेग हा साथीचा आजार सर्व देशभर पसरत गेला. भारतात या आजाराने तांडव करत जवळपास १२ दशलक्षांहून अधिक लोकांचा जीव घेतला. इसवी सन 1855 ते 1960 पर्यंत या आजाराचा प्रसार सक्रिय मानला गेला. या संपूर्ण आजाराचा अभ्यास केला असता असे समोर आले की, हा साथीचा रोग प्रामुख्याने बुबोनिक होता आणि महासागरामध्ये चालणार्‍या व्यापाराद्वारे तो जगभर पसरला गेला होता आणि संसर्गजन्य माणसे, उंदीर आणि पिसू यांच्या माध्यमातून तो पुढे पसरला होता.

कॉलिझर प्लेग (1850-1900)

कॉलिझर प्लेग हा तिसरा प्लेग म्हणजेच साथीचा आजार म्हणून ओळखला जातो. ज्याची सुरुवात कोरोनासारखीच चीन मध्ये सुरू झाली आणि तो जगभर पसरत गेला. आश्चर्य म्हणजे भारताला याचा अधिक त्रास झाला. भारतात हजारो बळी त्यावेळी या एका आजारामुळे गेले.

रशियन फ्लू (1889)

1889 च्या दशकात रशियन फ्लू नावाचा एक घातक इन्फ्लूएंझा म्हणजेच साथीचा रोग हा सर्व देशभर पसरल होता. जागतिक महामारीसारखे संकट तेव्हा ओढवले गेले होते. तासा तासाला या आजाराने मृतांच्या संख्येत वाढ होत जातं. या भयंकर आजाराने जगभरात सुमारे 1 दशलक्ष लोकांना ठार केले.

आजच्या 21 व्या शतकात कोरोना सारखी महामारी आली आहे. इतिहास असे सांगतो, संकटे येत जाणार आणि ते शमणार सुद्धा! जगाने कोरोनापेक्षाही भयंकर आजारांवर मात केली आहे. आता कोरोना ही महामारी कधी शमणार याचीच सर्वजण वाट पाहून आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments