आपलं शहर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले हे महत्वाचे मुद्दे ; शेतकऱ्यांबद्दल तर मोठा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधत तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्याचबरोबर, संवादाला सुरुवात करताना सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी नियमांचे पालन केले, साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला याबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. पाहूयात कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज मुख्यमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद.

1. कोरोना संदर्भात काय बोलले मुख्यमंत्री

● पुनश्च हरिओम म्हणजेच मिशन बिगेन अगेन मध्ये अनेक गोष्टींना शिथिलता देण्यात आली आहे. त्यामध्ये कार्यालयाची उपस्थिती वाढवत आहोत.
● आयुष्याची गाडी मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होतो.
● जबाबदारीचा हिस्सा नागरिकांवर टाकत आहे.
● परंतु, कोरोनाचे संकट गेलं नाही तर ते वाढत चालल आहे.
● कोरोनावर मात करण्यासाठी, “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हो मोहीम सुरू करत आहोत. यामध्ये आपली जबाबदारी आपल्या कुटुंबा पुरती असेल.
● सार्वजनिक ठिकाणी सदा सर्वदा स्वतःच्या संरक्षणासाठी मास्क लावून फिरायचे.
● आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, तर गर्दीच्या ठिकाणी मास्क लावून बोला.
● सार्वजनिक वाहनात शक्यतो बोलू नका, तसेच मीटिंग साठी व्हिडिओ कॉन्फरन्स चा वापर करा.
● लक्षणे आढळली तर सर्व माहिती आरोग्य यंत्रणेला द्या.
● समोरा समोर बसने टाळा त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल.
● ओपन मध्ये भेटणं सुरू करा, बंद जागी भेटणं टाळा.
सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाळा त्याने लॉकडाऊन शिथिल करण्यास मदत होईल.
● राज्यात ऑक्सिजन ची कमतरता भासत आहे त्यावर काम सुरू असून, 80 टक्के ऑक्सिजन हा आरोग्यासाठी वापरला जाईल.
● मुंबईची “चेस द व्हायरस” ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात लागू करत आहोत. म्हणेजच व्हायरस नागरिकांपर्यंत पोहचायच्या आधी आपण त्यांच्यापर्यंत पोहचू.
● राज्यात किमान दोन वेळा तरी आरोग्याची चौकशी करण्यात येईल. याची पूर्णतः जबाबदारी तेथील आमदारांची असावी.
● मुंबई आणि बाकी परिसरात निष्काळजीपणा दिसत आहे, तो थांबला पाहिजे.
● जिम, रेस्टॉरंट सुरू करू पण विशिष्ट नियमावलीत.
● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिथिलता आपल्या वागण्यात येता कामा नये.

2. नुकसान भरपाई, योजना व शेतकरी समस्या

● जवळपास 700 कोटी रुपयांची मदत निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानाला केली आहे आणि अजूनही सुरू आहे.
● पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना तत्काळ 18 कोटींची मदत करण्यात आली आहे.
● कोल्हापूर सांगलीच्या धर्तीवर पूरग्रस्तांना पूर्व विदर्भातही मदत मिळणार
● कोरोना काळात, सव्वा लाख गरोदर मातांना मोफत दूध भुकटी देत आहोत. साडे बारा लाख कुपोषित बालकांना दूध भुकटी दिलेली आहे.
● कोरोना काळात पावणे दोन कोटी शिव थाळ्यांचे वितरण झाले आहे.
● 29. 5 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे.
● यंदा विक्रमी कापूस खरेदी केला आहे.
● ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे, जिथे इंटरनेटची उणीव आहे तिने सुविधा उपलब्ध करत आहोत.
● शेतकरी वर्क फ्रॉम होम करू शकत नाही म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
● “जे विकेल तेच पिकेल” अशी व्यवस्था सुरू करत आहोत.
● येणारा महाराष्ट्र दर्जेदार पीकासाठी ओळखला जावा
● शेतकरी आता हमीभावासाठी लढणार नाही, आता त्याला हमखास भाव मिळणार.
● आपल्या राज्यातील शेतकरी कर्जदार शेतकरी न राहता
अभिमानाने महाराष्ट्रातील शेतकरी म्हणून ओळखला पाहिजे.
● शेतीमध्ये सुद्धा आगळी वेगळी क्रांती करायची आहे.

3. मुद्दा मराठा आरक्षणाचा

● सुरवाती पासूनच, सर्व पक्षाने एकमताने मराठा समाजाच्या न्यायासाठी निर्णय घेतला.
● आपलं सरकार मराठा आरक्षणासाठी लढाई लढत आहे. यासाठी सर्वोत्तम वकील दिले आहेत.
● मराठा आरक्षणाचा आपण कमी पडलो नाहीत.
न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती अनपेक्षित
● विरोधी पक्ष देखील मराठी समाजाच्या हितासाठी एकत्र काम करणार आहेत.
● मराठा आरक्षणाची लढाई कशी लढायची याची आखणी सुरू आहे.
● कोरोनाच्या महामारीत, मराठा आरक्षणावरून आंदोलन करू नका, रस्त्यावर उद्रेक नको कारण सरकार हे आपलं आहे.
● सरकार आपल्या सोबत आहे, कोरोनाच्या संकटात अधिक आंदोलन काढू नका, आम्ही आपल्याला वचनबद्ध आहोत त्यामुळे एकजुतीला तडा जाईल असा काम करू नका.
● कोरोनाचे संकटात, जबाबदारीचा हिस्सा आपण पार पडायचा आहे.
● संकट वाढतंय हे खरंय पण तुम्ही पालन करा जेणेकरून आपण यावर विजय मिळवू.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments