कारण

का कारणांमुळे लिफ्टमध्ये आरसे लावलेले असतात…

मुंबईकर, आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टींचा फायदा घेत असतात. अर्थातच संधीचा फायदा उचलणार नाही तो मुंबईकर कसला. आता असं झालय की या सुविधा आपल्यासाठीच आहेत म्हणून आम्ही मुंबईकर वापर करू लागलो आणि नकळत त्या गोष्टींची सवय कधी लागली ते समलच नाही, जस की लिफ्ट!

चांगला माणूस चार शतपावली चालत होता, शरीराचा व्यायाम होत होता, तर लिफ्टची सुविधा आली आणि मग मुंबईकर पायऱ्या काय ते विसरून गेला. आता फक्त आपत्कालीन वेळेस पायऱ्या वापरल्या जात असतील, अस म्हटलं तरी काही हरकत नाही.
 
शहरीकरणाने मुंबईला वेडं बनवलं. माणसाने मोठं मोठ्या इमारती उभ्या केल्या आणि त्यामध्ये लिफ्टची सोय केली. आता इतपर्यंत ठिक होतं, मात्र त्यात आरसा लावला. आता आम्हालाच एक प्रश्न पडलाय की लिफ्टमध्ये नेमका आरश्याचं काय काम? काय विचार असावा ह्या मागे? लोकांना चेहरे बघण्यासाठी तर नसेल ना? की आणखी काही उद्दिष्ट्य असेल यामागे?

चला तर मग वंटास मुबंईची टीम तुमच्यासाठी खास याचे उत्तर घेऊन आलीये.

का लावला जातो लिफ्टमध्ये आरसा
उद्वाहक म्हणजेच लिफ्टचा शोध 1853 साली लागला आणि मग पहिल्यांदाच लोक पायऱ्यांऐवजी त्याचा वापर करू लागले. सुरुवातीच्या काळात लिफ्टला आरसे नव्हते. कालांतराने काही कारणास्तव त्यात बदल करण्यात आले.
 
लिफ्टचा शोध लागल्यापासून मोठमोठ्या इमारती उदयास आल्या. लोकांचे खाली-वर जाणे सोपे झाल्याने अनेक आभाळवजा इमारती बांधल्या गेल्या. मोठं मोठे लोक तेथे येऊन राहू लागली. मात्र त्यावेळी लिफ्टला जास्त वेळ लागत असे, त्याच्या तुलनेच एखादा तंदुरुस्त माणुस भरभर पायऱ्या चढत असे. काही कालावधीनंतर ही गोष्ट लोकांना समजू लागली आणि त्यांनी लिफ्ट बनवणाऱ्या कंपनीकडे तक्रार केली.
 
 
कंपनीने या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. काही केल्या काही सुचत नव्हते. कारण त्यावेळी जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं, त्यात इतकच स्पिड मिळत होतं आणि जर मोठे उपाय करण्याचे ठरविले तर ते खर्चीक हिशोबात मोडत होते. मग साधा सरळ आणि स्वस्त उपाय काय असावा ह्यावर शोध सुरू झाला. यावर वैज्ञानिकांनी आपला शोध सुरू असता त्यांना समजले की, आपण लोकांची वेळ खर्च करायला हवी. लिफ्ट मधून प्रवास करताना लोकांकडे करण्यासाठी काहीच नसते म्हणून त्यांना वेळ समजून येते. म्हणून यावर एक तोडगा म्हणून वैद्यांनीकांकडून एक एक्सपेरिमेन्ट करण्यात आला तो म्हणजे लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आला.
 
 
प्रत्येकाला स्वतःला पाहण्याचा मोह असतो. लिफ्टमध्ये आरसे लावल्यामुळे लोकांचा वेळ स्वतःला पाहण्यात गेला आणि वेळ कसा जातो याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. वैद्यांनीकांचा हा एक्सपेरिमेन्ट सफल ठरला आणि लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आला. त्यामुळे लोकांच्या तक्रारी येणे बंद झाले.
 
त्यानंतर हळू हळू तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं आणि लिफ्टचे स्पिड वाढले, आता झालं असं की लिफ्टचे तंत्रज्ञान विकसित झालं, तिचं स्पिड वाढलं मात्र तिच्यातल्या काही सुविधा आहे तशाच ठेवण्यात आल्या, जसं की लिफ्टमध्ये लावलेला आरसा.
 
 
मुंबईत बहुमजली इमारती आहेत, तिथे सगळीकडे लिफ्टचा वापर केला जातो, इतकंच काय तर काही गृहनिर्माण संस्थांनी नियमच काढला की पाचहून अधीक मजली असलेल्या इमारतींमध्ये लिफ्ट असणे जबरदस्तीचे केले; सोबतच त्यात आरसा लावणे हे फॅशनेबल केले.
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments