आपलं शहर

Well done BMC! एका दिवसात शोधले रुग्णाच्या काँटॅक्टमधील 25 हजार लोकांना…

आतापर्यंत कोरोनाच्या प्रत्येक लढाईत मुंबईने आणि मुंबईकरांनी मोठी भुमिका बजावली आहे. या सगळ्यात अनेकांचा प्राण गेला तर अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली. हे सगळं असताना मुंबईची महानगर पालिका यंत्रणादेखील शांत राहिली नाही. अनेक पर्याय आणि अनेक उपाय योजना करण्यात बीएमसी मागे सरकत नाही. अशातच अजून एक कारणानामा बीएमसीने आपल्याला नावावर केला आहे.

बीएमसीने आता कोरोना रुग्णांच्या काँटॅक्टमधील लोकांना शोधण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी त्यांच्या यंत्रणेवर दबाव टाकत क्लोज काँटॅक्ट लोकांना शोधण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशाच पालन करत बीएमसी टीमने 11 सप्टेंबरच्या 24 तासात तब्बल 25 हजारहून अधिक क्लोज काँटॅक्टमधील लोकांना शोधून काढलं आहे.

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची एकुण संख्या 25 हजार 056 इतकी आहे. त्यापैकी अति जोखमीच्या गटातील लोक 12 हजार 142 तर, कमी जोखमीच्या गटातील 12 हजार 914 इतके लोक समोर आले आहेत.

झोपडपट्टीवर विशेष लक्ष
ज्या झोपडपट्टी परिसरात रुग्ण संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी सर्वे करुन तिथल्या क्लोज काँटॅक्टमध्ये असेलल्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यानंतर इतर नागरिकांची तपासणी केली जाते. झोपडपट्टी परिसरामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करताना अनेक अडचणी समोर येत असतात. सार्वजनिक शौचालय, दाटीवाटीमध्ये असलेली घरं, यामुळेच अनेक आजारांचं संक्रमण होण्याच प्रमाण झोपडपट्टी परिसरांमध्ये जास्त असतं. एक व्यक्ती त्याच्या दिवसभराच्या कालावधीमध्ये 15 इतर व्यक्तींना भेटतो, अशा समिकरणानुसार एका कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर 15 जणांची माहिती घेऊन तपासणी करणे,  हे समिकरण सध्या सुरु आहे.

मुंबईची परिस्तिथी?
मुंबईत सध्या 30 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतावपर्यंत 1 लाख 30 हजार 918 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तब्बल 1 लाख 69 हजार 741 मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 8 हजार 150 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकुण कोरोना रुग्णांची आकडेवारी 10 लाख 60 हजार 308 इतकी झाली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments