आपलं शहर

गणपती विसर्जनासाठी काय होतं पालिकेचं नियोजन…

आज 10 दिवसांसाठी आलेल्या बाप्पांचे विसर्जन झाले. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण न करता या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने लावण्यात आलेले निरबंध आणि सणांवर आलेल्या मर्यादा हे पाहाता अनंत चतुर्थदशीला दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी गर्दी होती. मुंबईतील चौपाट्या तसेच विसर्जन स्थळी पालिकेने आवश्यक ती संपूर्ण खबरदारी घेतल्याने कुठेच गर्दी दिसली नाही.

गिरगाव चौपाटीवर देखील योग्य ती खबरदारी घेत भाविक भक्तांचे हाल होऊ नये यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. गणेश भक्तांना चौपाटीवर परवानगी नसल्याने समुद्रापासून 2 किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांना परवानगी दिली नव्हती. बाप्पाची मूर्ती पालिकेच्या कर्मचारी यांच्याकडे सुपूर्द करायची, त्याचे विसर्जन पालिकेचे कर्मचारी करतील असा नियम आधीच बजावला होता. गणेश भक्तांनी विसर्जन स्थळी गर्दी करू नये, असे आवाहनदेखील आधीच केलं होतं.

पालिकेने केलेली तयारी
कृत्रिम तलाव – 168
मूर्ती संकलन केंद्र – 170
फिरते विसर्जन स्थळे – 37
नैसर्गिक विसर्जन स्थळे – 70
एकूण विसर्जन स्थळे – 445

विसर्जन स्थळावरील सुविधा
स्टील प्लेट – 896
नियंत्रण कक्ष – 78
जीवन रक्षक – 636
मोटर बोट – 65
प्रथम उपचार केंद्र – 69
रुग्णवाहिका – 65
स्वागत कक्ष – 81
तात्पुरते शौचालय – 84
निर्माल्य कलश – 368
निर्माल्य वाहन – 467
फ्लड लाईट – 2717
सर्च लाईट – 83
निरीक्षण मनोरे – 42
जर्मन तरफा – 45
कर्मचारी – 19,503
अधिकारी – 3,969

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments