एकदम जुनं

तुकाराम मुंढेंना जेव्हा ट्रकने उडवण्याचा होतो प्रयत्न, तर घरच्यांना येते धमकीचं पत्र…

आतापर्यंत IAS अधिकाऱ्यांच्या इतिहासात असं एकच नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे तुकाराम हरिभाऊ मुंढे. 2005 च्या बॅचचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना राज्य सेवेत येऊन 15 वर्ष होत आली. या कार्यकाळात त्यांची तब्बल 14 वेळा बदली झाली. नेमकी ही का झाली, कुठे झाली या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या त्या वेळेच्या बातम्यांमधून मिळाली आहेच, पण आता आपण याच अधिकाऱ्याच्या अशा इतिहासाबद्दल बोलणार आहोत, ज्यावर जास्त करून बोललं जात नाही.

वेळ तेव्हाची आहे, जेव्हा तुकाराम मुंढे पुणे महानगर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे सीएमडी म्हणून काम पाहात होते. त्यावेळेस त्यांच्या कामाची चर्चाही संपुर्ण महाराष्ट्रभर पसरली होती. त्याचवेळेस तुकाराम मुंढे यांना एक पत्र आले होते. या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका महिन्यात त्यांना आलेलं हे दुसरे धमकीचे पत्र होते. ही पत्रे एकाच व्यक्तीने पाठवली असल्याचे कालांतराने स्पष्ट झालं होतं.

पुण्यात येण्याआधी तुकाराम मुंढे सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी वाळू माफियांनी त्यांना ट्रक खाली चिरडण्याचा अयशस्वी प्रयत्नदेखील केला होता, अशा अनेक बातम्या त्यावेळी प्रकाशित झाल्या होत्या.

पत्रात काय लिहिले आहे…
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढें यांना भुजंगराव मोहिते या व्यक्तीने पत्र पाठवल्याच्या बातम्यांनी त्यावेळी जोर धरला होता. त्याच व्यक्तीने दुसऱ्यांदा मुंढे यांना पत्र पाठवून त्यांच्या कुटूंबाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पत्रात लिहिले होते की, “तुमचे डोळे फोडून तुम्हाला ऑफिसच्या बाहेर फेकून दिलं जाईल, हीच हालत तुमच्या घरच्यांचीही होईल. आम्ही आमचा प्लॅन बदलला आहे. आम्ही आधी तुम्हाला मारणार होतो, परंतु आता आम्ही आधी तुमच्या कुटुंबियांना नंतर तुम्हाला मारू. तुम्हाला कितीही पोलिस प्रोटेक्शन मिळालं तरी ते आम्हाला काहीही करु शकणार नाहीत. पुणे पोलिस हातावर हात घेऊन बसतील”. अशा आशयाचं ते पत्र होतं.

कालांतराने ही फक्त धमकी होती, हेच उघड झालं आणि फक्त त्या पत्राची चर्चा झाली होती, मात्र तशी कोणतीही घटना तुकाराम मुंढे यांच्यासोबत झाली नाही. सत्याच्या बाजूने लढाणे अनेक तुकाराम आतापर्यंत व्यवस्थेला कधी पचले नाहीत आणि इथून पुढेही पचणार नाहीत, अशा शब्दातही त्यावेळेस काहींनी निशेध व्यक्त केला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments