आपलं शहर

मुंबईची लोकल चालू करण्याचे संकेत देत असताना, मुंबईच्या लोकलची कितपत तयारी?

[et_pb_section][et_pb_row][et_pb_column type=”4_4″][et_pb_text]

सर्वसामान्य चाकरमानी लोकल प्रवास करू शकतील असा मार्ग काढा आणि पाच दिवसांत उत्तर द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले असताना ऑक्टोबरच्या मध्यात लोकल प्रवास खुला करण्याचे संकेत पर्यावरणमंत्री मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

मुंबईतील कार्यालय व लोकल सेवा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवली. सर्वसामान्य लोक लॉकडाऊनच्या काळात रेल्वे सोडून मिळेल त्या वाहनाने 4 ते 5 तास प्रवास करून मुंबई गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचदृष्टीने लोकांच्या खिशाला देखील कात्री बसत आहे. ज्याप्रमाणे लोकलसेवा सुरू होण्याचे संकेत जरी मुंबईकरांना मिळत असतील तरी मुंबईची लाईफ लाईन या सर्व परिस्थितीत सेवा देण्यास तांत्रिकदृष्ट्या कितपत तयार आहे.

हे देखील माहीत असणे गरजेचे आहे…

अनेकदा लोकलसेवा सुरळीत असताना मधेच ओव्हरलोड वायर तुटणे, रुळाला तडे जाणे अशा घटना घडतात. जवळपास 6 महिन्याच्या कठीण काळानंतर सर्व सामान्य लोकांसाठी रेल्वेसेवा सूरु झालीच तर पश्चिम रेल्वे अनेक नियमांच्या आधारावर चालू होईल तसेच लॉकडाऊनच्या काळात पश्चिम रेल्वेची अनेक काम ही पूर्ण झाली आहेत. राज्य सरकारने रेल्वे सर्व सामान्य लोकांसाठी चालू करण्याचे आदेश दिले तर आम्ही तांत्रिक दृष्ट्या चालू करण्यास तयार आहोत. लोकांनी सामाजिक अंतर पाळून लोकांना प्रवेश दिला जाईल अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेनंतर मध्यरेल्वे देखील राज्यशासनाच्या रेल्वे चालू करण्याच्या आदेशाची वाट पाहत असून, तांत्रिकदृष्टीने आमची तयारी आहे. राज्य शासनाने रेल्वे चालू करायचे आदेश दिले तर लोकांनी देखील आम्हाला पाठिंबा द्यावा व सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, अशा सर्व नियमांचे पालन करावे, असे देखी आव्हान मध्य रेल्वेकडून करण्यात येईल.

[/et_pb_text][/et_pb_column][/et_pb_row][/et_pb_section]

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments