कारण

बालपण कर्करोग जागरूकतेसाठी बनविण्यात आलेले चॉकलेटचे असे शिल्प तुम्ही कधी पाहिलेच नसेल !

 

संपूर्ण देशभरात सप्टेंबर हा महिना, बालपण कर्करोग
जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. कोरोना संकटाच्या काळात, याची कुठेतरी भूल पडली आहे. आज आपल्या देशात कर्करोगाचे अनेक प्रकार मृत्यूचा दर वाढवतात. यात बाल रुग्णांचाही समावेश आहे. त्यामुळे, कर्करुग्णाबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने मूर्तिकार रिंकू राठोड यांनी लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत लहान मुलांची अत्यंत प्रिय गोष्ट असलेल्या चॉकलेट पासून एक अनोखे शिल्प तयार केले आहे. रिंकू यांनी या शिल्पाद्वारे सर्वांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत बाल कर्क रुग्णांचे वाढविले मनोबल वाढविले आहे काय नेमकं शिल्प आहे पाहुयात वंटास मुंबईच्या या खास रिपोर्ट मधून ….

कोरोना संकटाच्या काळात, सप्टेंबर हा महिना बालपण कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो याची कुठेतरी भूल पडली आहे. परंतु, मूर्तिकार रिंकू राठोड यांनी ‘कॅन्सरपेक्षा काळजी मोठी आहे’ असे सांगत अनोख्या पद्धतीने बाल कर्करुग्णाच्या ताकतीची जाणीव करून देत बालपण कर्करोग जागरूकता महिन्याची आठवण करून दिली आहे. रिंकू राठोड यांनी, खुल्या तळहातामध्ये झोपलेले अर्भक दर्शवित संपूर्ण चॉकलेटचे शिल्प तयार केले आहे. हे शिल्प 20 किलो वजनाचे असून 2 फूट लांब आहे.

IMG 20200929 190223

या शिल्पामध्ये रिंकू यांची 30 तासांची मेहनत आहे. तसेच या शिल्पामध्ये बालपण कर्करोगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोनेरी रंगाच्या रिबनचाही समावेश केला असून तेही पूर्णपणे चॉकलेटपासून तयार केले आहे. तसेच, अ‍ॅक्सेस लाइफ या संस्थेचाही यामध्ये मोठा वाटा आहे. ही संस्था मुंबईत उपचारासाठी येत असलेल्या कॅन्सरशी लढा देणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नि: शुल्क निवारा देत असते.

त्यामुळे कर्करुग्णाची सेवा करणाऱ्या अ‍ॅक्सेस लाइफला मदतीचा हात देत रिंकू यांनी या चॉकलेट च्या शिल्पाचा उपक्रम राबविला. रिंकू यांनी कर्करोग झालेल्या मुलांना चॉकलेट आणि मोठाईचा आनंद घेण्याची परवानगी नाही हे जाणत, लहान मुलांचे बालपण थेट चॉकलेटशी कनेक्ट करून यावेळी जनजागृती करत आहोत असे सांगितले. या अनोख्या चॉकलेटच्या शिल्पाद्वारे रिंकू यांना बालपणीच्या लहान मुलांच्या आनंदांपासून वंचित असलेल्या दुर्दशा प्रकाशझोतात आणायच्या होत्या असेही त्या म्हणाल्या.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments