आपलं शहर

तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत अशी धमकी देत सरकार पाडण्याचा प्रयत्न !

 

भाजपाचा अपेक्षाभंग आणि भाजपा-शिवसेना युतीवर पाणी सोडत महाराष्ट्रात आज महाविकास आघाडी सरकार मोठ्या ऐटीत उभे आहे. सत्तेतल्या पक्षाला विरोधी बाकावर बसवून तीन चाकांची रिक्षा आपले सरकार टिकवत काम करत आहे. सरकार तोडण्याचा प्रयत्न केला नाही असे विरोधी आजवर जन्मले नाही. पण या बातमीचा मुद्दा वाचकांना चकित करणारा आहे, कारण येथे विरोधी पक्षाची जागा कोणी दुसरेच घेत सरकार पडण्याचा प्रयत्न करत होते. अर्थातच, प्रयत्नाला यश काही मिळाले नाही ! आता, कोण हे नवीन विरोधकांची भूमिका घेत सत्तेवर डोळा ठेवत होते पाहुयात वंटास मुंबईच्या या खास मसालेदार राजकारणी बातमीतून…

सरकार पाडण्याचा कट ?

पोलीसखात म्हणेज राजकारणी आणि जनतेतील  मध्यस्ती ! पण हेच मध्यस्ती जर सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर ? ऐकून थोडं विचित्र वाटत असेल तरी यात फार सत्यता आहे. खुद्द महाविकास आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे वक्तव्य केले आहे. लोकमत ऑनलाइनला मुलाखत देताना, आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न काही पोलिसांकडून करण्यात आला होता. काही आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास सरकार पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तो आम्ही तो वेळीच हाणून पाडला असा धक्कादायक गौफस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

या अधिकाऱ्यांनी सत्तेतील आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने केली होती, असं सांगत गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये चार ते पाच अधिकाऱ्यांचा समावेश होता व त्यात एक वरीष्ठ महिला अधिकारी देखील होती.
दरम्यान याबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.

पोलीस खात्यात काही अधिकारी हे चांगले काम करत असतात. पण काही अधिकारी असेही असतात की, जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून असतात. त्यामुळे या काही पोलिसांच्या वरचा मुखीया हा राजकारणातला असावा अशी शंका उपस्थित होते असेही गृहमंत्री सांगतात. तसेच नुकत्याच झालेल्या पोलीस बदलीत या अधिकाऱ्यांना आम्ही बाजूला सारले व काही अजूनही महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय बोलतात, अधिकारी जर सरकार पाडायचे काम करू लागले तर निवडून आलेल्या नेत्यांचा काय उपयोग ? महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार एव्हडे लेचेपेचे नाही. काही अधिकाऱ्यांविषयी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात मते सांगितली होती. काहींना ताबडतोब बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातील किती बदल झाले, हे गृहमंत्रीच सांगू शकतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments