आपलं शहर

मुंबईकरांनी गमवले, पालिकेने कमवले; 21 दिवसांत 1 कोटी 64 लाख…

गेल्या काही दिवसांपासून बृन्मुंबई महानगरपालिकेची शहरभरात धडक कारवाई सुरु आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमासोबत विनामास्क फिरणाऱ्यांवर पालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. मास्क न वापरणाऱ्याला प्रत्येक 200 रुपये दंडदेखील आकारण्यात येत आहे. 9 एप्रिल ते 21 ऑक्टोबर या कालावधीत महानगरपालिकेने तब्बल 1 लाख 752 जणांवर कारवाई केल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

(The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) on Thursday said that it had collected a sum of ₹1.64 crore from more than 82,000 people between October 1 and 21)

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असले तरी अनेक नागरिक विना मास्क बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पालिकेने पुढाकार घेऊन मास्क न वापरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मागील 1 ते 21 ऑक्टोबर या 21 दिवसांच्या कालावधीत एकूण 82 हजार 497 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येक नागरिकांकडून 200 रुपये याप्रमाणे एकूण 1 कोटी 64 लाख 96 हजार 900 इतकी रक्कम दंड स्वरुपात वसूल करण्यात आली.

9 एप्रिलपासून सुरु केलेल्या कारवाईपेक्षा मागील 21 दिवसांत केलेली कारावाई ही 82 टक्के असल्याची माहितीही पालिकेने दिली आहे. दंडापोटी मागील 21 दिवसांत वसूल केलेली रक्कम ही आतापर्यंतच्या एकूण रकमेच्या सुमारे 72 टक्के इतकी आहे.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहलसह अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई वेगवान करण्यात आली आहे. त्यामुळे आपण जर विनामास्क बाहेर फिरत असाल, तर तुमच्या खिशातले 200 रुपये विनाकारण बीएमसीला द्यावे लागणार आहेत, हे नक्की.

(BMC started its drive in April and till October 21 acted against a lakh people and collected Rs 2.3 crore. Around 82 % faced action in the last three weeks, a civic official said.)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments