फेमस

मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय

मुंबईत सध्या अनेक प्रकल्पांची सुरुवात होत आहे, त्यातच अजून एका प्रकल्पची सुरुवात लवकरच होणार आहे. मुंबईत जागतिक पातळीचे मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय उभारले जाणार आहे.

गाणसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरु करण्याची घोषणा उच्च, तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. हा प्रकल्प लवकरच सुरु केला जाईल आणि यामध्ये फक्त महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील आणि परदेशातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात जागतिक पातळीवरचे कोणते संगित महाविद्यालय नाही. त्यामुळे नव्या पिढीतील गायक, संगितकार यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, ते मिळावं, या भावनेने या महाविद्यालयाची सुरुवात केली जाणार आहे.

मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

सरकारकडून लता दीदींच्या 91 व्या वाढदिवशी भेट म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे. लतादीदींना हा निर्णय नक्कीच आवडेल. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील. असे मत उदय सामंत यांनी मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments