आपलं शहर

आजपासून जिम सुरु, मात्र या गोष्टी केल्या नाहीत, तर होणार कारवाई

दसऱ्याच्या मुहुर्तावर राज्यात अनेक गोष्टी सुरु होत आहेत. गेले 7 महिने बंद असलेले जिमचे दार आजपासून उघडणार आहे. अनेक जिम मालकांसह तरुणांनीही राज्य सरकराकडे विनंती केली होती, या विनंतीवर आता राज्यसरकारने शिक्का मोर्तब केला आहे.

जनतेच्या आरोग्यासाठी असलेल्या जिम, फिटनेस सेंटर्स आणि अनेक व्यायामशाळा या सुरु झाल्या पाहिजे, मात्र त्यात वावरत असताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने एसओपीदेखील जारी केली आहे. याच्या माध्यमातून अनेक जिम मालकांना आणि जिममध्ये व्यायाम करणाऱ्या सगळ्यांनाच या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

जिममध्ये जाण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा

राज्य सरकारने दिलेल्या वेळेतच जिम सुरु कराव्या लागतील.
जिमच्या क्षमतेनुसार मर्यादित संख्येत व्यायाम करणाऱ्यांना प्रवेश देणे गरजेचे
जिममध्ये येणाऱ्या सर्व सदस्यांना नियमावली माहीत असणे गरजेचे
प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी आणि तिथे काम करणाऱ्या सदस्यांची वारंवार आरोग्य तपासणी झाली पाहिजे
जिममधील साहित्यांचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे गरजेचे
अनेक उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक
शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता, शक्य होईल तितका मास्क वापरणे गरजेचं
जिमच्या क्षेत्रफळांनुसार सुरक्षित शारीरिक अंतर राखणे महत्वाचे
दररोज रात्री व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे
सामूहिक व्यायाम प्रकार झुम्बा, स्टीम, सौना बाथ यांच्यावर बंदी कायम

(Gyms and fitness centers outside containment zones are set to reopen on October 25 and there is a list of ‘Guidelines)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments