कारण

मुख्यमंत्री vs राज्यपाल : पत्रांचा गडबडीत राष्ट्रपती राजवट लागणार?

‘राष्ट्रपती राजवट’ हा शब्द महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. 2019 मध्ये महाराष्ट्रात जे सत्ता नाट्य झालं, ते कोणालाही नवं नाही. काही दिवसांची राष्ट्रपती राजवट लागली आणि भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला, त्याचवेळी राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. त्याचा फायदा दुसऱ्या पक्षांना झाला, हे तितकच खरं आहे, मात्र त्याच राष्ट्रपती राजवटीचा दिवस महाराष्ट्राला पुन्हा पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.

सद्या महाराष्ट्रात सुरु असलेला राज्यपाल विरुध्द राज्य सरकार हा वाद आता सर्वांसमोर उघड झाला आहे. त्यामुळे हा वाद राष्ट्रपतींकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य शासानाकडे मंदिर उघडण्याबाबत विचारणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर याच पत्रातून सवाल केला होता, या पत्राला उद्धव ठाकरे यांनी तात्काळ उत्तर दिलं होतं, मात्र हे पत्र युद्ध हळू हळू पेटण्याची शक्यता आहे.

दर महिन्याला राज्यातल्या परिस्थितीचा आढावा राष्ट्रपतीकडे मांडण्याचं काम राज्यपाल करत असतात. त्यामुळे राज्याच्या बिकट परिस्थितीवर राज्यपाल आपली नाराजी व्यक्त करतील आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, याची मागणी करतील. कॉन्स्टिट्यूशनल ब्रेकडाउनच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, याप्रकारचे निवेदन राष्ट्रपतींना देण्याचे अधिकार राज्यपालांकडे राखून आहेत.

(Maharashtra: Guv Bhagat Singh Koshyari and CM Uddhav Thackeray in unholy row over reopening of temples)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments