आपलं शहर

मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान ; बदनामीसाठी उघडले 80 हजार फेक अकाऊंटस्

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला जवळपास चार महिन्यांचा काळ उलटून गेला असला तरी त्याच्या मृत्यूवरून रोज नवनवीन वाद सुरूच आहे. गेल्या चार महिन्यात कोरोना संकटानंतर दुसऱ्या बातमीने लोकांचे लक्ष वेधले ते म्हणेज अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण. चाहत्यांचा आक्रोश, मीडियाचे कव्हरेज आणि त्यात मुद्याला सोडून चाललेलं राजकारण, या सगळ्या गोष्टी सातत्याने समोर येत होत्या. त्यात आता मुद्दा उठलाय तो म्हणजे मुंबई पोलिसांवर आतापर्यंत झालेल्या बदनामी पाठच्या षड्यंत्राचा. राजकारणाच्या साथीला हाथ देत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी करत असलेल्या मुंबई पोलिसांवर फक्त आणि फक्त बदनामीसाठी जवळपास 80 हजार फेक अकाऊंटस् उघडण्यात आले.

14 जून रोजी अभिनेता सुशांतसिंग हा मुंबईतील वांद्रे येथे त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या चौकशी बाबत सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासा दरम्यान त्याने आत्महत्या केल्याचे जवळपास स्पष्ट करण्यात आले होते. तरीही कालांतराने हा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला. सीबीआय कडे तपास आणि मुंबई पोलिसांच्या तपासाच्या मधल्या काळात मुंबई पोलिसांची तपसावरून राजकारणी, सोशल मीडिया वरून नाहक बदनामी करण्यात आली. चक्क त्या वेळी मुंबई पोलिसांना आणि तपासाला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर तब्बल 80 हजार फेक अकाऊंटस् सुरू केली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एक अहवाल तयार केला असून, त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख केला आहे. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी 80 हजारपेक्षा जास्त बोगस अकाउंट तयार करण्यात आले. सुशांतच्या मृत्यूनंतर जून महिन्यात हे अकाउंट तयार करण्यात आले होते. या अकाउंटवरून मुंबई पोलिसांविरोधात मोहीम राबवण्यात आली.

वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर केलेली ही फेक अकाऊंटस् फक्त भारतातीलच नसून इतर देशातूनही या पोस्ट केल्या आहेत. परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरलेले होते, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

“हजारोंच्या संख्येने असलेल्या या फेक अउंट्सवरून मुंबई पोलिसांना शिव्या देण्यात आल्या. पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जाणीवपूर्वक मुंबई पोलिसांविरोधात मोहिम चालवण्यात आली. या अकाउंटची ओळख आम्ही पटवली आहे. आम्ही ट्विटर, फेसबूक आणि इतर सोशल मीडियासोबत चर्चा करत आहोत. यातील काही अकाउंट विदेशातील असण्याची शक्यता आहे. या अकाउंटवरून खोटी माहिती पसरवण्यात आली. मुंबई पोलीस दलाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलं,” असे यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments