आपलं शहर

तुम्हाला माहित आहे का आपल्या शरीरावर ‘एवढा’ वेळ जीवंत राहू शकतो कोरोना विषाणू….

 

कोरोना संसर्गाने जगभर आपले जाळे निर्माण करत थैमान घातले आहे. जवळपास 7 ते 8 महिने उलटून गेले तरीही ठोस असे औषध या आजारावर मिळत नाही. त्यामुळे जरी लोकांनी कोरोनसोबत जगायला शिकले असेल तरी मनात भीती ही तितकीच आहे. कोरोनासारख्या सांसर्गिक आजराला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. उपाय कधी मिळेल याची शाश्वती कुणी देत नसले तरी कोरोना आजराला धरून नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यामध्ये माणसाच्या शरीरावर कोरोना किती काळ टिकून राहू शकतो याबाबत माहिती देण्यात आली आहे.

माणसाच्या शरीरावर कोरोना किती वेळ राहू शकतो जिवंत ?

आतापर्यंत कोरोना या विषाणूंच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत. मग ते कोरोना हवेमार्फत पसरतो, एका कोरोनामुक्त व्यक्तीला पुन्हा कोरोना आपल्या विळख्यात घेऊ शकतो इ. दरम्यान नुकतेच, जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने (Kyoto Prefectural University of Medicine) कोरोनाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना बरेच तास माणसांच्या त्वचेवर टिकून राहू शकतो. जर कोरोनाला अनुकूल वातावरण मिळाल्यास मानवी त्वचेवर 9 तास कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो.

यावर अनेक प्राणी व माणसांच्या त्वचेवर कोरोना कितीवेळ राहू शकतो, यासंबंधी अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात दिसले की, कोरोना इन्फ्लूएंझा-A व्हायरसपेक्षा जास्त काळ माणसांच्या त्वचेवर टिकू शकतो असे संशोधन करणारे तज्ञ मंडळी सांगतात.

कोरोनावर जरी ठोस उपाय सापडला नसला तरी, स्वच्छता ठेवणे, पौष्टिक आहार घेणे व वारंवार हाथ स्वच्छ धुणे या गोष्टी नकळतपणे कोरोनावर औषधांचे काम करत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो कमी वेळात आपले जाळे निर्माण करू शकतो. तसेच जपानच्या या अभ्यासातून वारंवार हात स्वच्छ करणं किती आवश्यक आहे, हे स्पष्ट झाले आहे. या व्यतिरिक्त सॅनिटायझर वापरण्यापेक्षा पाणी आणि साबणाने हात धुणे नेहमीच फायदेशीर ठरेल असेही स्पष्ट होते.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments