आपलं शहर

गणेशोत्सवातले नियम व अटी नवरात्रौत्सवात लागू…

‘कोविड – 19’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे तसेच राज्य शासनाद्वारे देखील मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सवादरम्यान देण्यात आलेल्या सूचना व कार्यपद्धतीनुसार आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने मूर्तीकारांना मंडप उभारण्याची परवानगी देण्याविषयी अधिक सुलभ कार्यपद्धती आणि ‘कोविड’ संदर्भातील हमीपत्र इत्यादी बाबींचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक मंडळांकरिता जास्तीत जास्त ४ फूट उंच, तर घरगुती देवींच्या मूर्तींची उंची २ फुटांच्या मर्यादेत असावी. त्याचबरोबर देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी आणि सर्व मंडपांमध्ये निजंर्तुकीकरणाची व्यवस्था करण्यासह शारीरिक अंतराचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी हात वारंवार साबणाने धुणे, सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’चा (मुखपट्टी) सुयोग्यप्रकारे वापर करणे आणि दोन व्यक्तिंमध्ये किमान 2 मीटरचे अंतर राखणे; या 3 नियमांची आपापल्या स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे व शासनाद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या विविध मार्गदर्शक सुचनांचे अत्यंत काळजीपूर्वक व काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे. हर्षद काळे, महापालिका उपआयुक्त

मंडप परवानगी बाबत…
गणेशोत्सवादरम्यान गणपती मूर्ती तयार करण्यासाठी उभारावयाचे तात्पुरते मंडप (मूर्तीकारांचे मंडप) उभारण्याबाबतच्या यापूर्वीच देण्यात आलेल्या सूचना नवरात्र व अन्य उत्सवांदरम्यानही लागू राहणार असल्याचे संबंधित परिपत्रकात यापूर्वीच नमूद करण्यात आले आहे. तसेच दि. २९ सप्टेंबर, २०२० नुसार ‘शासन परिपत्रक क्र. आरएलपी-०९२०/प्र.क्र.१५६/विशा १ ब’ अन्वये सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२० साजरा करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना शासनाकडूनही प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने दिनांक ३० सप्टेंबर २०२० पासून मूर्तीकारांच्या मंडपांना विहित शुल्क आकारुन परवानगी देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दिनांक ११ मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रक ‘क्र.एमडीएफ/२७/जन,’ अन्वये देखील मूर्तीकारांना परवानगी देण्यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाअन्वये मूर्तीकारांच्या मंडपांसाठीचे अर्ज स्वीकारण्यास असलेला कमी अवधी व कोरोना साथरोग प्रतिबंधक उपाययोजनात पोलिस यंत्रणेची व्यस्तता विचारात घेता, यावर्षी परवानगी देण्याच्या पद्धतीत अंशतः बदल करण्यात येत आहे. मागील वर्षी ज्या मूर्तीकारांना परवानगी दिली आहे, अशा मूर्तीकारांचे अर्ज यावर्षी स्थानिक / वाहतूक पोलिसांकडे न पाठविता, मागील वर्षीची पोलिस परवानगी ग्राह्य धरुन विभाग कार्यालयातर्फे छाननी करुन त्यांना परवानगी देण्यात येत आहे. मात्र, नव्याने व प्रथमतः अर्ज करणा-या मूर्तीकारांच्या अर्जांची छाननी पूर्वीप्रमाणेच स्थानिक / वाहतूक पोलिस तसेच विभाग कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

‘कोविड-१९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बाबींबाबत मूर्तीकारांकडून मंडप उभारणी अर्जासह हमीपत्र घेण्यात येत आहेत. हे हमीपत्र गणेशोत्सवादरम्यान प्रसारित केलेल्या हमीपत्रानुसार असल्याने सदर नमुना नवरात्रौत्सावासाठीही ग्राह्य धरण्यात येत आहे. अर्ज सादर करणा-या मूर्तीकारास कोविड संदर्भातील हमीपत्र विभाग कार्यालयामार्फत देण्यात येत असून, ते मूर्तीकाराकडून स्वाक्षरीसह घेण्यात येत आहे. विभाग कार्यालयांनी परंपारिक मूर्तीकारांना परवानगी द्यावी व अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती निव्वळ विक्रिसाठी मंडप उभारण्याची परवानगी देवू नये, असेही आदेशित करण्यात आले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments