आपलं शहर

संजय राऊतांना राष्ट्रपती बनविले तर, राष्ट्रपती राजवट मान्य!

 

आजकाल महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अवकाळी पावसासारखी वापरली जात आहे, गरज नसताना विरोधकांकडून नुसती बरसात होत आहे. सत्ता येणारचं असा गौण विश्वास भाजपाला असताना त्यांच्या तोंडातून महाविकास आघाडीने सरकार खेचून घेतले. आता सैरावैरा झालेलं भाजप, सरकार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधला जात आहे. सध्या राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात चाललेले पत्राचे युद्ध चर्चेचा विषय ठरत असताना मधेच स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा ने उडी घेतली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार, राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होणार, असा बोलबाला विरोधक करत असताना स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं भाजपवर ट्विट करत निशाणा साधला आहे. “संजय राऊत राष्ट्रपती होणार असतील तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही,” असे हसून दात पडणारे खळबळजनक ट्विट कुणालने करत अप्रत्यक्षरित्या भाजपला टोला हाणाला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरा सोबत जेसीबी घेतलेला फोटो ट्विट केला होता. यावर महाराष्ट्रात पहिल्यांदाच कुणाल ला प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा फोटो चर्चेचा विषय देखील बनला. मुळात, कुणाल कामराचा “शटअप” नावाचा पॉडकास्ट आहे ज्यामध्ये तो अनेक राजकारणी मंडळींशी बातचीत करतो. “संजय राऊत सरांनी शटअप या कुणालंच्या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरू करेन, अन्यथा शक्यता कमी आहे,” असं ट्विट कुणाल कामरानं केलं होतं.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments