फेमस

‘घंटी बडवणारं आमचं हिंदुत्व नाही’ उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

आजचा दसरा मेळावा काही औरच आहे, कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतरचा शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असली तरी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून शिवसेनेचा सण म्हणून मोठ्या दणक्यता साजरा होणारा दसरा मेळावा सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरा झाला, फक्त जल्लोष हा धुमधडाक्याचा नसून जल्लोष हा मुख्यमंत्री पदाचा होता. तशी, कोरोना संकटामुळे शिवाजी पार्क मध्ये साजरा होणारा दसरा मेळावा पहिल्यांदा सावरकर सभागृहात फक्त 50 विशेष उपस्थितीत होत आहे.

मुख्यमंत्री पद बजावतना पहिल्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतील, यावर सर्वांची नजर होती. विरोधकांच्या टीकेला समर्पक उत्तर मिळेल की, राज्यावर आलेल्या संकटावर मुख्यमंत्री काय वक्तव्य करतील असे अनेक संभ्रम नागरिकांच्या मनात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना अचंबित केले. विरोधी पक्षाच्या टिकांचे रावण आज मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणातून त्यांचे चांगलेच दहन केल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धडक भाषणातील टोले

● उद्धव ठाकरे यांनी सुरवात, मी मुख्यमंत्री झाल्यापासून हा पहिलाच दसरा मेळावा आहे. मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण हे सरकार पाडण्याच्या मागे आहेत, मी इथून आव्हान देतो की, हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा अशी 36इंच छाती फुगवत थेट विरोधकांना चॅलेंज केले.

● पुढे जाऊन, शिवसेनेचा दसरा मेळावा हा सभागृहात होत नाही आपल्याला सभेसाठी शिवाजी पार्क मैदान सुद्धा कमी पडत असे ते म्हणाले. “आम्ही गुळाला चिकटणारे मुंगळे नाही, मुंगळा कसा डसतो ते आम्ही दाखवू, तसेच जो आमच्या आडवा येईल त्याला आडवा करून छाताडावर पाय ठेवून गुढी उभी करून पुढे जाऊ” अश्या तिखट भाषेत त्यांचा द्वेष त्यांनी व्यक्त केला.

● विचारांचं सोनं घेऊनच आम्ही पुढे चाललो आहोत. तसेच बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला, वाघाची अवलाद आहोत डीवचाल तर पस्तावाल, औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीने गाडला आहे अश्या शब्दात शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली.

● मंदिर उघडली नाहीत म्हणून आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे, शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमच हिंदुत्व यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, बाबरी पाडली तेव्हा कोण बिळात लपून बसले होते. आमचं हिंदुत्व हे बुरसटलेले नाही असेही ते म्हणाले.

● “मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्याना बडवणारा हिंदू पाहिजे”, गाय मरो आणि माय जगो असे आमचे हिंदुत्व नाही. गाय म्हणजे माता आणि तिथे जाऊन खाता हे त्यांच्या भाषणातील लक्ष वेधून घेणार वक्तव्य होत.

● हा दसरा मला भव्य करता आला असता पण मला माझ्या जनतेची काळजी आहे आणि आम्ही कायदा पाळतो. जितकं लक्ष तुम्ही पक्षावर देत आहात ते लक्ष देशावर द्या.

● 38 हजार कोटी हे केंद्राकडून महाराष्ट्राला येण बाकी आहे. असे असताना बाकी राज्यात मोफत लस वाटतं आहेत. आमचा GST चा पैसा हा आमच्या हक्काचा आहे आणि केंद्र राज्याला देत नाही. मी इतर राज्यांना एकत्र येण्याचे आवाहन करतो.

● छत्रपतींकडून जर आपण काही शिकलो नाही तर त्यांचा जयजयकार करण्याचा अधिकार आपल्याला नाही, छत्रपतींचा एक वाक्य आहे. होय मी शत्रूला दगा दिला आहे पण मी मित्राला दगा दिला असे एक तरी उदाहरण दाखवा.

● मोदींवर टीकेची धुरळ उडवत, काश्मीर भारतात परत आनणार असे मोदी म्हणाले होते काय झाले ? असा खडा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

● मुंबई आणि महाराष्ट्राच मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची. मराठी माणसाला भीक मागून नाही तर हक्काने खायला शिवसेनेने शिकवले आहे.

● आशावाद दाखवत, उद्योजकांना निमंत्रण देतो आहे महाराष्ट्र मध्ये उद्योग वाढवा. हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात तरुणांसाठी येत आहे. भूमिपुत्रांना मी आवाहन करतो की, मला इथले तरुण उद्योगधंदे करताना दिसले पाहिजेत असे मुख्यमंत्री म्हणाले.

● कोरोना च्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पुढे जात आहे म्हणून बदनामी केली जात आहे. मुंबई पोलीस निक्कमे आहेत असे बोलले जात आहे.

● पोलिसांचा देखील मी कुटुंब प्रमुख आहेत त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही, छातीवरती गोळी घेऊन अतिरेक्याला जिवंत पकडणारे जगात एकमेव मुंबई पोलिस दल आहे याचा मला अभिमान आहे.

● महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये गांजाचे नाही तर तुळशी वृंदावन आहेत ही आमची संस्कृती आहे. महाराष्ट्रात पाकव्याप्त काश्मीर असेल तर ते महाराष्ट्राचे नव्हे तर पंतप्रधानांचे अपयश आहे. तोंडात गोमूत्र आणि शेण भरून आमच्यावरती गुळण्या केल्या. काय झालं ? आता ते तोंड घेऊन गप्प बसा.

● महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करतो की सावध राहा. आम्ही महाराष्ट्राचा कारभार तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित करत आहोत. मुंबईला महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. मुंबईचा लचका आम्ही असेपर्यंत तोडू देणार नाही.

● तुमच्याकडे लाठीकाठी असेल आमच्याकडे तलवार पकडण्याचे मजबूत मनगट आहे.

● जंगलाच संवर्धन करण्याचे काम हे या सरकारने केलं आहे.
कारशेड हे हलवण्यात आले आहे त्यामध्ये सरकारचा एक रुपया देखील गेलेला नाही. अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही. इथे मर्द मावळ्यांच सरकार आहे.

● शेवटी, एक दिवस असा दिवस येईल की जनता म्हणेल की कोणीही चालेल पण हे केंद्रात हे सरकार नको. ओबीसी समाज, मराठा समाज, धनगर समाज, या सर्वांना मी सांगतोय की सर्वांना आम्ही न्याय देणार हे मी मुख्यमंत्री म्हणून सांगतो आहे. सर्वांना आवाहन करतो की, कोणत्याही राजकारणाला बळी पडू नका व महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असे मी काही करणार नाही असे मी बेलभंडारा घेऊन शपथ घेतो असे म्हणत आपले भाषण संपन्न केले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments