कारण

आजूबाजूला लक्ष ठेवा ; ‘विना मास्‍क’ आढळून आल्यास आता “हे” लोक करू शकतात अधिकृत कारवाई

 

सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुयोग्यप्रकारे ‘मास्क’ सदोदीत परिधान करणे, हा कोरोना या संसर्गजन्‍य रोगास प्रतिबंध करण्‍याचा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे जगभरातील तज्ज्ञांद्वारे वेळोवेळी सांगितले जात आहे. याच अनुषंगाने ‘मास्क’ वापरण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने सर्वस्तरीय जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘विना मास्क’ सार्वजनिक ठिकाणी वावरणा-यांवर रुपये 200/- एवढी दंड आकारणी देखील करण्यात येत आहे. ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश देतानाच महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी ही कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई पोलिस दल, वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेच्या सर्व 24 विभाग कार्यालयांना दिले आहेत.

महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या अति वरिष्ठ अधिका-यांची एक विशेष बैठक ‘दूरदृश्‍य प्रणाली’द्वारे आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी ‘विना मास्क’ विषयक दंडात्‍मक कारवाई आता पोलिस देखील करणार असा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. यानुसार संबंधित संस्थांचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी यांच्याद्वारे नियमितपणे कारवाई सुरु आहे. ‘विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करणार आहे. सार्वजनिक परिसरांमध्‍ये ‘विना मास्क’ वावरणा-या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये 200 याप्रमाणे दंडात्‍मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. यानुसार आजतागायत 40 हजार पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये 1  कोटी 5  लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

कोण करणार आता मास्क नसल्यावर कारवाई ?

● मुंबई पोलिस दल व वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई सुयोग्यप्रकारे व्हावी, याकरिता महापालिकेच्या सर्व 24 विभागांच्या स्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

● तसेच दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला (मॉर्निंग वॉक) जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

● आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments