फेमस

‘याचं काही तू मनात नको ठेवू’ Mumbai Indians ला दुबईमध्ये मराठीत धडे…

IPL 2020 चा 13 वा हंगाम जरी प्रेक्षकांविना असला तरी त्याची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतात वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे ते सामने दुबईमध्ये खेळवले जात आहेत. त्यामुळे तिथल्या वातावरणाशी, तिथल्या मैदानांशी नवीन असलेल्या अनेक खेळाडूंना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच जुन्या खेळाडूंनी नव्या खेळाडूंना शिकवणी देण्यासही सुरुवात केली आहे.

आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुध्द किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) असा सामना रंगणार आहे, या सामन्याआधी सराव करताना मुंबईचा खेळाडू दिग्विजय देशमुख याला अनुभवी गोलंदाज झहीर खान याच्याकडून मराठीत धडे मिळत असल्याचे समोर आले आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दिग्विजय देशमुखला बॉलिंगच्या टिप्स देताना झहीर खान त्याच्याशी आपल्या मातृ भाषेत म्हणजेच मराठीमध्ये बोलताना दिसत आहे. 2019 सालच्या आयपीएल लिलावाआधी मुंबई इंडियन्सने झहीर खानची डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स या पदावर निवड केली होती.

बॉलिंग करतेवेळी पायाची जागा नेमकी कुठे असायला पाहिजे? या प्रश्नावर दोघांचं संभाषण सुरु आहे. यावेळी झहीरचा अनुभव दिग्विजयच्या कामी आल्याचे पाहायला मिळत आहे. “जर एकच बॉल तुला सामन्यात टाकायचा असेल, तर नेटमध्ये वारंवार त्याच बॉलचा सराव करायचा. एकसारखा त्याच गोष्टीचा सराव केल्यास त्या सामन्यापुर्ती त्याची सवय होईल, एका ठिकाणहून बॉल रिलीज केला तर तो बॉल कुठे जातो, ते आपल्याला लवकर समजतं,” असं झहीर म्हणतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments