आपलं शहर

मुंबई लोकल सुरु करणार? महाराष्ट्र सरकार म्हणालं, हरकत नाही!

मुंबई आणि उपनगरी भागातील हजारो सामान्य प्रवाश्यांना (अत्यावश्यक सुविधेमध्ये न येणाऱ्यांना) मोठा दिलासा मिळणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने लोकल सुरु करण्याबद्दल महत्त्वपुर्ण माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मते लोकलने प्रवास करणारे प्रवासी जर मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळत असतील, तर लोकल सुरु करण्यासाठी काहीच हरकत नाही. मात्र या लोकल सामान्यांसाठी कधीपासून सुरु करण्यात येणार आहेत, याबद्दल कोणताच खूलासा सरकारने केला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारला सामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासंदर्भात प्रश्न केला होता, त्यावेळेस राज्य सरकारकडून उत्तर देण्यात आलं आहे. वकील आणि न्यायालयीन कर्मचार्‍यांना लोकलने प्रवास करण्यासंदर्भातील याचिकेवर निकाल देताना हा प्रश्न करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने यापूर्वी लोकल सेवा सुरु करण्यासंबंधित निर्णय घेतला होता, त्याससोबतच गर्दी रोखण्यासाठी मुंबईत धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची सूचनादेखील केली होती.

सध्या लोकल ट्रेन सर्वच प्रवाश्यांसाठी उपलब्ध नाही. ज्यांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यांच्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुंळे मर्यादित गाड्यांमध्ये गर्दीही होऊ शकते आणि सामाजिक अंतराचे नियमही मोडू शकतात, त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दुसरीकडे, अनेक कार्यालयीन वाहक, जे अत्यावश्यक प्रकारात येत नाहीत त्यांना एमएसआरटीसी बस किंवा खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागतो ज्यामुळे त्यांना घरून कामावर जाण्यासाठी सात ते आठ तास लागतात, इतकंच नाही तर हा प्रवास इती महागाचा होत आहे. त्यामुळे सामान्यांसाठी लोकल कधी सुरु करणार, हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments