आपलं शहर

“तुम्ही एकदा शरद पवारांशी बोलून घ्या” राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राज्यात निर्माण झालेल्या वीज बिल प्रश्नावर तात्काळ निर्णय घ्यावा आणि सरकारसमोर तशाप्रकारची बाजू मांडावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

राज ठाकरे काय म्हणाले?
अनेक दिवसांपासून माझ्या पक्षाच्या माध्यमातून वीजबिलांविरोधात आंदोलने केली जात आहेत. याप्रकरणी अदानी, बीएसटीचे लोक येऊन भेटून गेले. त्यांनी स्पष्ट केलय की एमईआरसीने (Maharashtra Electricity Regulatory Commission) मान्यता दिल्यास आम्ही वीजबिल कमी करू शकतो. मात्र एमईआरसीच्या मते वीज कंपन्या स्वत: वीज बिल कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. म्हणून या प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीसाठी आम्ही भेटलो होतो, असे माहिती  राज ठाकरे यांनी दिली.

आज (29 ऑक्टोबर 2020) राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी एकदा शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिलाय. मी पवार साहेबांसोबत या विषयावर बोलणार आहे. मला वाटतं या विषयाबद्दल राज्यसरकारला चांगलीच माहिती आहे. लोक जिथे 2000 रुपये बिल भरायचे, तिथे आता 10 हजार भरावे लागत आहेत. याची कल्पना राज्य सरकारला आहे, तर मग प्रकरण कशात अडकलंय, हे समजत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

वीजबिलासंदर्भात आता राज्यपालांची भेट झाले, त्यानंतर शरद पवारांशी या विषयावर फोनवरून अथवा भेटून चर्चा करेन, गरज भासल्यास मुख्यमंत्र्याशी याविषयावर चर्चा करेन, असंही राज ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अनेकांचे रोजगार गेलेत, अनेकांकडे पैसे नाहीत, त्यात वाढीव बिल कसं भरणार, हा अनेकांपुढे प्रश्न आहे. एका छोट्या निर्णयासाठी एवढे दिवस लागतात कसे, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments