आपलं शहर

मुंबईत मास्क न घालणारे सर्वाधिक लोक ‘या’ भागात…

नागरी महामंडळ आणि शहर पोलिसांनी या पट्ट्यात जास्तीत जास्त उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

विना मास्क फिरणाऱ्यांमध्ये मुंबईच्या उत्तर भागातील लोकांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे, नागरी संस्था आणि मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून ही गोष्ट समोर आली आहे. उत्तर मुंबईत मास्क न वापरणाऱ्या 5,741 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, तर बीएमसीकडून 17,037 जणांवर दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 2,279 पोलिस प्रकरणे उत्तर मुंबईतील आहेत तर आर दक्षिण प्रभागात 1,629 लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. उत्तर मुंबई गोरेगाव ते दहिसरपर्यंत आहे. तेथे पी उत्तर, पी दक्षिण, आर मध्य, आर उत्तर व आर दक्षिण विभाग पडतात. या प्रभागात 4,479 लोकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 16,76,800 रुपये किंमतीचा दंड वसूल केला आहे. यापैकी एकट्या कांदिवली आणि चारकोप या आर दक्षिण प्रभागातून 6,66,600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

महानगरपालिकेच्या कारवाईअंतर्गत दुसर्‍या क्रमांक हा सी प्रभाग आहे. या प्रभागात 1,305 प्रकरणे व 5,87,300 रुपये दंड वसूल केला आहे. या प्रभागात पायधुनी, मरीन लाईन्स, चिराबाजार, काळबादेवी आणि भुलेश्वर या विभागांचा समावेश आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकंणी यांनी मिड डेला सांगितले, “आम्ही लोकांना नियमांचे पालन करावे आणि कोविड 19 पासून सर्वांचे रक्षण करावे असे आवाहन करतो. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments