आपलं शहर

लोकल बंद, तरीही लोकलमुळे 150 जणांचा लॉकडाऊनमध्ये मृत्यू

मुंबई – जूनच्या मध्यापासून, भर लॉकडाऊनमध्येच लोकल सुरु करण्यात आल्या. फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या नागरिकांसाठी मध्य, पश्चिम आणि हर्बर लोकलच्या प्रवासाची मुभा दिली. यादरम्यान कोणत्याही सामान्य नागरिकांना प्रवासाची परवाणगी नाही, तरीही लोकलमध्ये गर्दी कशी हा प्रश्न सध्या उपस्थित आहेत, मात्र याव्यतिरिक्त अजून एक प्रश्न समोर येत आहे, लॉकडाऊनमध्ये लोकल सुरु झाल्यापासून तब्बल 150 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

रेल्वे पोलिसांच्या यादीत आतापर्यंत म्हणजे मागील 105 दिवसात 150 पेक्षा जास्त जणांच्या मृत्यूची नोंद आहे. लॉकडाऊन दरम्यान कमी मृत्यू झाले असले तरी आवश्यक सेवांमधील नागरिकांना परवाणगी दिल्यानंतर इतके मृत्यू कसे, हा सवाल उपस्थित राहतोच.

जीआरपीच्या (Government Railway Police) आकडेवारीनुसार 15 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान झालेल्या 151 मृत्यूंपैकी 135 मृत्यू हे रेल्वेमार्ग ओलांडताना झाले आहेत. यामध्ये 126 पुरुष आणि 9महिलांचा समावेश आहे. तर 16 जणांचा मृत्यू लोकलमधून पडून झाला आहे, यामध्ये 14 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेवरील कल्याण रेल्वे पोलिसांमध्ये 93 मृत्यूंची नोंद आहे, तर ठाणे रेल्वे पोलिसांमध्ये 84 जणांची नोंद आहे. पश्चिम रेल्वेवर वसई विरार दरम्यान 53 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याचदरम्यान 28 जण जखमी झाल्याचीही नोंद पोलिसांत आहे.

“आम्ही जनतेला विनंती करतो की त्यांनी रेल्वेमार्ग ओलांडू नये. प्रत्येक स्थानकावर फूट ओव्हरब्रिज बनविण्यात आले आहेत आणि त्यांनी त्यांचा वापर करावा. सध्या मध्य रेल्वेवर दररोज 1.5 लाख प्रवाशांसाठी 431 लोकल फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेमध्ये २ लाखाहून अधिक प्रवाशांसह 506 लोकल फेऱ्या सुरु करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

जानेवारी ते मार्च या काळात मृत्यूचे प्रमाण जास्त होते आणि लॉकडाऊन दरम्यान ते कमी झाले होते. यावर्षी, आतापर्यंत 465 लोकांचा रेल्वेमार्ग ओलांडून मृत्यू झाला आहे आणि 147 प्रवासी लोकलमधून खाली पडून मृत्यू झाल्याची माहिती जीआरपीच्या आकडेवारीनुसार समोर आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments