आपलं शहर

मुंबईच्या पठ्ठ्याची थेट Amazon च्या CEO कडून दखल, मोबाईल हरवल्याची तक्रार

समजा तुम्ही एखाद्या वस्तूची ऑनलाईन ऑर्डर केली आणि दिलेल्या मुदतीच्या आत ती ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहचली नसेल, तर तुम्ही काय कराल?

अशीच घटना घडले मुंबईतल्या एका तरुणासोबत. त्या तरुणाने आपली ऑर्डर डिलिव्हर न झाल्याने थेट Amazon चे प्रमुख (CEO) जेफ बेजोस यांनाच ई-मेल केला आणि आश्चर्य; बेजोस यांनी याची चांगलीच दखल घेतली. (amazon ceo jeff bezos)

ई-मेल असा होता…

‘हाय जेफ,

मी तुमच्या ग्राहक सेवा आणि डिलिव्हरी व्यवस्थेवर नाराज आहे. मी अ‍ॅमेझॉनवरुन जो फोन ऑर्डर केला होता, तो मला डिलिव्हरच करण्यात आला नाही. डिलिव्हरी बॉयने तो माझ्या सोसायटीच्या गेटवरच ठेवला. तो तेथून चोरीला गेला. माझ्या ऑर्डरबाबत मला डिलिव्हरी बॉयकडून कोणताही फोन करण्यात आला नव्हता.

विशेष म्हणजे तुमची कस्टमर सर्व्हिस टीम नेहमी पाठंतर केलेलं उत्तर देते, की तपास सुरु आहे. ते ऐकताना आपण एखाद्या रोबोटशी बोलतो आहोत की काय असं वाटतं.

जेफ बेजोस यांनी हा मेल वाचल्यानंतर संबंधीत टीमकडे याच्या कारवाईबद्दल चौकशी केली. यानंतर अॅमेझॉनच्या ऑफिसमधून तक्रारदार तरुणाला संपर्क केला आणि कारवाई करण्यास सुरुवात केली. कारवाईनंतर उघड झालं की तो फोन त्याच्या गेटवरून चोरीस गेला होता, आणि ज्यावेळी डिलव्हरी बॉयने तो फोन गेटवर ठेवला होता, त्यावेळेस त्याने ग्राहकाला फोनही केला नव्हता. अखेर सर्व कारवाई करून संबंधीत तक्रारदाराला त्याचा फोन सुपुर्त केला.

विशेष म्हणजे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या जेफ बेजोस यांनी संबंधित मेल केवळ वाचलाच नाही, तर तो तात्काळ अ‍ॅमेझॉनच्या टीमकडे पाठवून त्यावर कारवाई करण्यास सांगितले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण कितीही मोठा व्यवसाईक असलो तरी आपल्या ग्राहकांशी जोडून राहिलं पाहिजे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments