आपलं शहर

उद्यापासून मुंबई मेट्रो सुरु; मात्र प्रवाशांना पाळावे लागणार ढीगभर नियम

राज्यात मिशन बिगीन अगेनद्वारे शिथिलता येत आहे. सात महिन्यापासून बंद असलेली मुंबई मेट्रो अखेर उद्यापासून (सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी) रुळावर धावणार आहे. अनेक नियमांच्या आधारे उद्यापासून मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या काळात मेट्रो सेवा चालू राहणार असून, दिवसातून 200 हून अधिक मेट्रोच्या फेऱ्या असतील तर एकावेळी 300 प्रवासी सोशल डिस्टन्ससचे पालन करून प्रवास करतील.

मुंबई मेट्रो 1 ची प्रवासादरम्यानची नियमावली

 • मुंबई मेट्रोचा प्रवास सकाळी 8.30 ते रात्री 8.30 पर्यंत होणार
 • दिवसाला 200 हुन अधिक फेऱ्या असतील एका मेट्रोमध्ये 300 प्रवासी प्रवास करू शकतील
 • तिकीट कसे असेल –
  प्लास्टिक टोकनऐवजी क्यूआर पेपर तिकीटस्, स्मार्ट कार्ड, डिजीटल तिकीट यांचा वापर होणार
 • मेट्रो मधील आसन व्यवस्था – अल्टरनेट सिटींग अॅरेंजमेंट, प्रवाशांना एकाआड एक सीटवर बसण्याची परवानगी
 • उभ्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही विशिष्ट मार्किंग केलेल्या जागेतच उभे राहून प्रवासाची परवानगीमेट्रो स्टेशन वर प्रवेश कसा असेल –
 • मेट्रो स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग होईल
 • ठिकठिकाणी प्रवाशांना सॅनिटाझरची सोय उपलब्ध असेल
 • स्वच्छतेसाठी विशेष प्रोटोकॉल
 • मेट्रोच्या नव्या प्रोटोकॉलनुसार मेट्रो स्थानके आणि ट्रेन्सची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण होणार
 • मेट्रो स्थानकांची सुरक्षा अधिक कडक केली आहे
 • प्रवाशांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसींग पाळणे बंधनकारक
 • गर्दी होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरुन मर्यादित प्रवासी संख्येलाच प्रवेश देण्यात येईल
 • प्रवेश द्वारांवरच प्रवाशांकरता सूचना आणि प्रोटोकॉलची माहिती देण्यात येईल.
 • गर्दी लक्षात घेऊन मर्यादित प्रवासी संख्येलाच आत सोडले जाईल
 • कॉमन टचींग पॉईंटस् स्टेशन, तिकीट खिडकी, सीट, टेन्सचे खांब यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जाणार
 • ट्रेनच्या आतमधील तापमान व्यवस्था –
 • ट्रेनच्या आत तापमान नियंत्रण आणि मोकळ्या हवेसाठी व्यवस्था
 • ट्रेनच्या आतील तापमान हे 25 ते 27 डिग्री इकते ठेवले जाईल.
 • मोकळ्या हवेसाठी मेट्रोचे डंपर वेळोवेळी उघडे ठेवले जाईल.

मेट्रोचे द्वार प्रत्येक स्टेशनवर 30 सेकंद खुले राहिल तर, टर्मिनस स्टेशनवर 180 सेकंद खुले राहिल जेणेकरुन मोकळी हवा आत प्रवेश करु शकेल

कोणत्या गेट वरून तुम्हाला मेट्रो स्टेशन वरून प्रवेश मिळेल –

१. वर्सोवा – १ नंबर गेट वरून प्रवेश मिळेल ( वर्सोवा बस डेपो वरून )

२. डी एन नगर – गेट नंबर ४ आणि ५ गेट वरून प्रेवश ( इंडीयन आॅईल जंक्शन वरून )

३. आझाद नगर – गेट नंबर १ आणि २ गेट वरून प्रेवश ( अंधेरी स्पोर्टस काॅम्पलेक्स )

४. अंधेरी – गेट ५ डी आणि WR FOB वरून प्रवेश ( प्रसादम हाॅटेल वरून )

५. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे – पहीला गेट हायवेच्या इथून प्रवेश

६. चकाला – गेट नंबर १ आणि २ वरून प्रेवेश मिळेल (कोटक महींद्रा बॅंक)

७. एअर पोर्ट रोड – गेट नंबर १ आणि २ वरून प्रेवेश मिळेल (लीला बिझनेस पार्क)

८. मरोळ नाका – गेट नंबर ३ वरून प्रेवेश मिळेल (पर्ल ॲकेडमी)

९. साली नाका – गेट १ आणि २ वरून प्रेवेश मिळेल (ब्लु स्टार)

१०. असल्फा – गेट नंबर २ आणि ३ वरून प्रेवेश मिळेल (मंदीराच्या बाजूला )

११. जागृती नगर – गेट नंबर १ वरून प्रेवेश मिळेल (मुख्यप्रेवेश द्वार)

१२. घाटकोपर – गेट नंबर २ A आणि २B वरून प्रेवेश मिळेल (घाटकोपर गेस्ट हाऊस)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments