आपलं शहर

मुंबई पालिकेने कंगनासाठी खर्च केले 82 लाख, 50 हजार रुपये…

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद गाजताना दिसत आहे. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने उडी घेतली होती. वाद रंगलेला असतानाच पालिकेने कंगनाच्या घरावर कारवाई करत तोडफोड केली. त्याविरोधात कंगनानेही उच्च न्यायलायत पालिकेविरुद्ध याचिका दाखल केली होती.

सर्वसामान्य मुंबईकरांकडून कराच्या रुपात गोळा केला जाणाऱ्या पैशांची मुंबई पालिकेकडून अशाप्रकारची उधळपट्टी केली जात असल्याची माहिती शरद यादव यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागितली होती.

घरावर कारवाई केल्यानंतर कंगनाने न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. त्याबद्दलची सुनावणी बाकी असताना पालिकेच्या बाजूने जेष्ठ वकिल, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय हे पालिकेच्या बाजूने न्यायलयात बाजू मांडत आहेत. त्यांनी आतापर्यंत 11 वेळा न्यायालयात पालिकेची बाजू मांडली आहे. त्यामुळे एका दिवसाचे 7 लाख 50 हजार रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण 80 लाख 50 हजार रुपये खर्च या एका न्यायालयीन प्रकरणावर पालिकेने केला आहे.

एका बाजूला कोरोनामुळे आलेल्या महासंकटातून पुढे जात असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री कंगना राणावतने दाखल केलेल्या याचिकेवर बाजू मांडण्यासाठी पालिकेकडून उधळपट्टी सुरु असल्याचं दिसत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments