खूप काही

हायकोर्टाकडून थेट मुंबई पोलिसांना मॅसेज; “तुम्ही काय काम करता!”

नवी मुंबईतल्या सुनैना होळे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केली होती, त्यासंदर्भात पोलिसांनी तिच्यावर 3 गुन्हे दाखल केले आहे. ते गुन्हे रद्द करावेत, या मागणीसाठी सुनैना होळे यांनी मुंबई उच्च न्यायलयामध्ये याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी करत असताना उच्च न्यायलयाने थेट मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी (29 ऑक्टोबर) रोजी सुनावणी सुरु होती, त्यादरम्यान न्यायमूर्तींकडून मुंबई पोलिसांचं विशेष कौतूक करण्यात आलंय.

गेले काही महिने मुंबई पोलिसांसमोर कठीण काळ उभा आहे. त्यांच्यासमोर रोजच अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. कधी मिरवणुका, कधी दंगली, कधी मोर्चे अशा अनेक परिस्थितींशी त्यांना सामोरे जावं लागतं. या सगळ्यात पोलीस 12-12 तास काम करतात. त्यामुळे मुंबई पोलीस हे जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक आहेत. मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डमधल्या पोलिसांसोबत होत असते, त्यामुळे जसं मुंबई पोलीस आपलं कर्तव्य बजावतात, त्याचप्रकारे मुंबईकरांनीही त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असं मत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी खंडपीठासमोर मांडलं आहे.

सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजवला असताना राज्यातल्या पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली आहे, मनामध्ये भीती असतानाही आपले कर्तव्य चोख बजावण्यामध्ये मुंबई पोलीस कधीही मागे पडत नाहीत, याप्रकराचं तोंडभरून कौतूक मुंबई उच्चन्यायलायचे न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठाने केलं आहे.

(“Mumbai Police Is Considered As One Of the Best In The World”, Observes Bombay High Court)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments