फेमस

मुंबईतल्या ‘या’ एकट्याने लॉकडाऊनला हारवलं!

‘अंगात कला असली, की माणूस कुठेही, कसाही आणि कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो’ हे वाक्य वेळोवेळी अनेकांनी सिद्ध करून दाखवलय. सध्याच एका तरुणानेही हे वाक्य सिद्ध करून दाखवलं आहे.

जगात सगळीकडे कोरोनाची महामारी आहे. कोरोना पसरू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला आणि याच्यातच अनेकांचे संसार उद्धस्त झाले. ज्यांना जमलं त्यांनी आपल्या संसाराला सावरण्याचा आतोनात प्रयत्न केला, ज्यांना नाही जमलं ते हतबल झाले, अनेकांनी जिवनाचा संघर्ष अर्ध्यावर सोडला तर अनेकांनी या जीवनाला संघर्षाची ढाल करून पुढे केलं. आज अशाच तरुणाची गाथा आपण पाहाणार आहोत, ज्याने लॉकडाऊनवर मात करत, आपला संघर्ष कायम ठेवला आहे.

औरंगाबादमध्ये Bsc चं शिक्षण पूर्ण करणाऱ्या सुरेश सूर्यवंशींची ही कहाणी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरेशी अक्षरांशी ओळख झाली. त्यानंतर तर 10 वर्षे औरंगाबादमधील कॉलेज, गार्डन, बिबी का मकबरा अशा ठिकाणी उभं राहून सुरेश लोकांना त्यांच्या नावाचे टॅटू बनवून द्यायचे. ते करत असलेल्या कामाला कॅलिग्राफी म्हणतात हे समजायला त्यांना तब्बल 10 वर्ष लागली, पण जेव्हा समजलं तेव्हा यातच मोठं करिअर करायचं असं त्यांनी ठरवलं.

अनेकांना आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईची गरज वाटते, तशाचप्रकारे सुरेश यांनाही वाटलं आणि त्यांनी मुंबईची वाट धरली. मुंबईत आल्यानंतर डोंबिवलीत संसार उभे केला आणि नरिमन पॉईंट, वांद्रे स्टेशन, कल्याण स्टेशन बाहेर उभं राहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्यांच्या नावाचे टॅटू बनवून देण्यास सुरुवात केली. मध्यंतरी मराठा क्रांती मोर्चा जेव्हा मुंबईत धडकला होता, तेव्हा आंदोलकांच्या अंगावर टॅटू काढण्याचं कामही महाशयांनी सोडलं नाही. आवडत्या गोष्टीमध्ये काम करण्याची लाज कसली, हे एक वाक्य त्यांच्या संघर्षाचं प्रतीक होतं.

मुंबईमध्ये आपल्या कामाचा जम बसतोय, असं समजत असतानाच आणि आपला व्यवसाय वाढवण्याचे नियोजन मनामध्ये सुरु असतानाच अचानक कोरोनाने घाला घातला आणि लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्वसामान्यांप्रमाणे सुरेश आणि कुटुंब आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. लॉकडाऊन संपता संपत नसल्याने सुरेश यांनी पुन्हा मुंबईची वाट धरायचं ठरवलं.

मुंबईत आलो खरा, मात्र इथं पहिल्यासारखा पर्यटक वर्ग कुठेच नव्हता, त्यामुळे कामासमोर पुन्हा संकट उभे राहिलं. आता करायचं काय, हा सवाल समोर येत असतानाच आयुष्यात कधीतरी अक्षरांशी मैत्री झालेली, सुरेश यांना आठवलं आणि त्यांनी त्याच आक्षरांना पुन्हा संघर्षाची ढाल बनवली. आज तिचं आक्षरे सुरेश सुर्यवंशींच घर सांभाळत आहेत.

सुरेश सुर्यवंशी हे सध्या कॅलिग्राफिच्या माध्यमातून घरांच्या समोर लागणाऱ्या नेमप्लेट बनवण्याचं काम करतात. डोंबिवली पश्चिमेला रस्त्यावर बसून अनेक प्रकारच्या नेमप्लेट ते साकारत असतात. हीच गोष्ट एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केली. आणि सुरेश यांचं नशिब उजळलं. सुरेश यांना आता मोठ्याप्रमाणात ऑर्डर येऊ लागल्या आहेत. डोंबिवलीत राहणाऱ्या व्यक्तींसाठी 400 ते 500 रुपयात घरपोच नेमप्लेट पोहोचवण्याचं काम सुरेश करतात तर डोंबिवली बाहेर राहणाऱ्या व्यक्तींसाठी 900 रुपयात घरपोच नेमप्लेट पोहचवतात. घरातून संघर्षाची जिद्द मनी बाळून निघालेल्या या सुरेश सुर्यवंशी यांनी आज खऱ्या अर्थाने लॉकडाऊनवर विजय मिळवला आहे, असच म्हणावं लागेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments