फेमस

Powerfull Country : जगातील ‘या’ सर्वश्रेष्ठ यादीतून भारताचा नंबर घसरला…

सिडनीतील ‘लोवी इंस्टीट्यूट’च्या माध्यमातून दरवर्षी एक यादी सादर केली दाते. या यादीमध्ये अनेक देशांचा समावेश असतो. देशाची आर्थिक परिस्थिती, आयात-निर्यातीकरण, स्कोअर रेट, इतर देशांच्या व्यवयांमध्ये भागीदारी आणि अशा अनेक गोष्टींना विचारात घेऊन लोवी इंस्टीट्यूट एक सर्वे करते. या सर्वेतून आलेला रिपोर्ट ती जगासमोर सादर करत असते, ज्याला ‘अशिया पॉवर इंडेक्स’ असं म्हणतात.

या निर्देशांकानुसार, आशिया पॅसिफिक क्षेत्रावर परिणाम करणारा सर्वात सामर्थ्यवान देश म्हणजे अमेरिका ठरला आहे. अमेरिकेने या यादीत आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे, परंतु दोन दरवर्षी वाढत जाणारा अमेरिकेचा दर यंदा कमी झाला आहे, असं या यादीच म्हटलं आहे.

भारताचा संरक्षण नेटवर्क स्ट्राँग
जपाननंतर भारत यादीतील चौथा सर्वात शक्तिशाली देश आहे. भारताने वर्षभर आपली आर्थिक क्षमता आणि सैन्य क्षमता वाढविली आहे. भारताने संरक्षण नेटवर्कला घेऊन सर्वात जास्त कामं केली आहेत, असं या यादीत नमुद करण्यात आलं आहे. चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सातत्याने बळकट होत आहे. मात्र भारताचे आर्थिक संबंध तसेच राजनयिक आणि सांस्कृतिक प्रभाव गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे, असंही या यादीत म्हटलं आहे.

लोवी इंस्टीट्यूटच्या अशिया पॉवर इंडेक्स 2020 च्या मते 2019 साली भारताचा एकूण स्कोअर रेट 41.0 होता. तो 2020 मध्ये 39.7 वर आला आहे. या यादीत ज्या देशांचा स्कोअर रेट 40 किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यालाच जगातील शक्तीशाली देश मानले जाते. गेल्यावर्षी भारताचा या यादीत समावेश होता. पण यावर्षी थोड्या अंकानी भारत यादीतून बाहेर झाला आहे.

(Who wields most power in Asia? US tops Lowy index but China is catching up, India ranks 4th)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments