आपलं शहर

दिवाळीच्या फटाक्यांत दहशतवाद्यांचे बॉम्ब ? गुप्तहेर यंत्रणा सतर्क

 

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत, दुष्काळात तेरावा महिना अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. होय, कोरोनाशी झुंज देणाऱ्या मुंबईत आणखी एक संकट ओढावल्याची बातमी आहे. लाखोंच्या संख्येत गजबजणाऱ्या मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुप्तहेर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.

कोरोना संकटाच्या काळात, हळूहळू मुंबई पूर्वपदावर येत असताना मुंबईकरांना धसका देणारी ही बातमी नुकतीच गुप्तहेर विभागाच्या सतर्कतेमुळे समोर आलेली आहे. आता दिवाळी सणाच्या तोंडावर दहशतवादाचे सावट मुंबईवर आले आहे. ड्रोनसदृश उपकरणातून दहशवादी मुंबईला टार्गेट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पुढील 30 दिवस सतर्कतेचा इशारा देत हाय अलर्ट जारी केला असून सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे हा हल्ला ड्रोनद्वारे होण्याची शक्यता असल्याने मुंबई आणि परिसरात ड्रोन तसेच फ्लाईंग ऑब्जेक्ट्स उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.

दहशतवादी गर्दीचे ठिकाण टार्गेट करण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तात वाढ देखील करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या गुप्तहेरांच्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी त्वरीत 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घातली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम 188 अतंर्गत कारवाईचा इशारा दिला आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments