आपलं शहर

ठरलं! खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित! ‘या’ राष्ट्रवादी नेत्यांचा शिक्कामोर्तब!

काल नंदुरबारमध्ये समर्थकांनी बहुचर्चित नेते एकनाथ खडसेंना घेराव घातला. त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की मुंबईहून काही आनंदाची बातमी आणलीत का? असा सवाल केला, तर या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ खडसेंनी स्मित हास्य केलं. शरद पवार आणि माझ्यात चांगली चर्चा झाली. नवरात्रीच्या पहिल्या माळेत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार, असं विधान समर्थकांसमोर केल्याची माहिती खडसे समर्थक आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत गेलेले उदेसिंग पाडवी यांनी पत्रकारांना दिली.

काही दिवसांपुर्वी मी मुक्ताईनगरला गेलो होतो. त्यावेळी साहेब मुंबईहून परत आलेले, मुंबईला काय घडलं, याबाबत मला जाणुन घ्यायचं होतं. शरद पवार यांच्याशी खडसेंची चर्चा होणार होती, याची मला पूर्ण कल्पना होती. त्या उत्सुकतेपोटी मी जळगावला गेलो. त्यावेळेस खडसे साहेबांच्यात आणि माझ्यात काही गोष्टींना घेऊन बोलणं झालं, असा दावा उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.

उदेसिंग पाडवी म्हणतात की जेव्हा माझ्या पक्ष बदलण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या तेव्हा एकनाथ खडसेंनी मला मार्गदर्शन केलं होतं, त्यांनीच मला म्हटलं होतं की तुला जायचंच असेल, तर राष्ट्रवादीसारखा दुसरा पक्ष नाही. तुझं पुनर्वसन तिथेच होईल” असा दावा उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.

त्यामुळे येत्या काळात उदेसिंग पाडवी यांनी केलेलं विधान योग्य ठरण्याचे संकेत सर्वाधिक आहेत. येत्या काळात जर एकनाथ खडसे यांनी भाजपचे कमळ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधलं तर काही आश्चर्य वाटून घेण्यासारखं नसेल, मात्र एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे म्हणजे भाजपला अनेक ठिकाणांहून उतरती कळा लागणे होय, असंदेखील अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments