आपलं शहर

7 जणांचा बळी घेणारा मुंबईतला हिमालय पूल पुढच्या वर्षी होणार…

तुम्हाला 2019 मधल्या 14 मार्च रोजी घडलेली घटना आठवते का? तुम्ही मुंबईचे असाल तर तुम्हाला आठवायलाच हवी. कारण यादिवशी मुंबईतील सगळ्यात गजबजलेल्या ठिकाणी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडलेला हिमालय पूल कोसळला होता. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 32 जण जखमी झाले होते.

मुंबईत पूल दुर्घटना अनेक घडल्या आहेत, त्यात अनेकजणांचा बळी गेलाय. तशाचप्रकारची ही दुर्घटना होती.  गाड्यांच्या ताफ्यातून जाण्यापेक्षा अनेक नागरिक दुसऱ्या बाजूने पूलावरून सीएसएमटीकडे जात होते.

नवीन हिमालय पूलाचे काम 2020 पासून सुरु होणार होते, मात्र कोरोनाच्या काळात या कामाला अडथळा निर्माण झाला आणि त्याचे काम सहाजिकच पुढे ढकल्यात आले होते. आता या पूल बांधणीला मुहुर्त मिळाला आहे. येत्या जानेवारी महिन्यात या पुलाचे काम सुरु होऊन डिसेंबर 2021 मध्ये याचे संपुर्ण बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. या पूल बांधणीचा अंदाजित खर्च साडेसहा कोटी इतका असल्याचे म्हटले जात आहे.

जरी कोरोनाचा काळ सुरु झाला असला तरी मधल्या काळात पूल बांधणीसंदर्भात प्राथमिक स्वरूप, पुलाचा आराखडा, उंची-लांबी-रुंदी याबाबत सल्लागारांकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. यानंतर लवकरच पूल बांधण्यासाठी महत्वाची असलेली निविदाही काढली जाणार असल्याची माहिती स्पष्ट केली जाणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(New bridge to come up at CSMT where Himalaya bridge collapsed in March2019)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments