कारण

WHO ; एका जागी जास्त वेळ बसून राहणे सिगारेट पेक्षाही धोकादायक !

 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आले. कामासाठी “वर्क फ्रॉम होम” चा पर्याय पुढे आला. लॉकडाऊन असल्या कारणाने घरात बसून राहणे नियमांच्या अटीत होते. एका रूममध्ये 24तास बसून राहणे, त्यात घरी बसूनच काम करणे, शरीराची हालचाल मंदावणे अश्या अनेक हानिकारक गोष्टींचा सामना सध्या नागरिक करत आहेत. माणसाला निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाल महत्वाची असते, पण सध्या वर्क फ्रॉम होम आणि कोरोनामुळे शक्य नाही. पण ही गोष्ट माणसाच्या आरोग्यासाठी किती प्रमाणात घातक आहे याचा अंदाज सामान्यांना नक्कीच नसेल.

कोरोनामुळे बैठे काम वाढले आहे. लोकांचे चालणे कमी झाले आहे. त्यामुळे आता एका जागी जास्त वेळ बसून राहणे सिगारेट ओढण्यापेक्षाही गंभीर आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, त्यासाठी त्यांनी त्याला ‘सिटींग ईज न्यू स्मोकिंग’ असे नाव दिले आहे.

तेव्हा एका जागी जास्त वेळ बसू नका, चालत रहा, नाही तर मधूमेहाचे शिकार व्हाल, असे स्पष्ट मत इंडियन डायटिक असोसिएशनच्या उपाध्यक्षा व मुंबई डायट अ‍ॅण्ड हेल्थ सेंटरच्या डायरेक्टर डॉ. शिल्पा जोशी यांनी व्यक्त केले.

‘वर्क फ्रॉम होम’मुळे बसून काम केल्याने शरीराला व्यायाम नाही, एकाच जागी खायचे आणि तिथेच काम करायचे. असा सगळा शेड्युल सामान्यांचा झाला आहे. तसेच, कोरोनाची वाढती आकडेवारी बघितली तर मनात कुठेतरी मलाही कोरोनाची लागण होऊ शकते या भीतीने तणाव वाढतो. मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्यांची तर तणावाने शुगर वाढत आहे. घरातच असल्यामुळे खाण्यावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात नाही आला तर कोरोनाचा धोका अधिक बळावतो. दुसरीकडे, ऑनलाइन गेम्स, मोबाईलचा वाढत असलेला वापर हे सगळे बैठे होत असल्याने कुठेतरी शरीराची हालचाल होत नाही.

कोरोना संकटाच्या काळात, शरीराची हालचाल होईल याकडे लक्ष द्या. दररोज 20 ते 30 मिनिटे शतपावली चाला जेणेकरून शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर स्वतःला फिट ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे कामाबरोबर आपल्या शरीराकडे देखील तितकेच लक्ष द्या.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments