फेमस

“उद्धव ठाकरे, लाज वाटली पाहिजे बोलताना” असं का म्हणाली कंगना रनौत ?

अत्यंत संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल दसरा मेळाव्याच्या दिवशी वाघाच्या रुपात आपल्या विरोधकांवर हल्ले करताना पहायला मिळाले. मुख्यमंत्री पदाचा वचक सांभाळत कालच्या भाषणातून उद्धव ठाकरेंचे नवीन रूप जनतेला पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपाच्या इतरही नेत्यांची चांगलीच टोलेबाजी करत सडेतोड उत्तर देत सगळ्यांना अचंबित केले.

विरोधी पक्षांच्या टिकांना साजेसे उत्तर देत उद्धव ठाकरेंनी अभिनेत्री कंगना रनौतला चांगलाच मराठी बाणा दाखवून दिला. खरे तर, नाव न घेताच कंगनाला झापल, पण समजने वाले को इशारा काफी है , आणि बरोबर तीर निशाण्यावर लागताच समोरून कंगना बावरली. दसरा मेळाव्याच्या भाषणात “मुंबई आणि महाराष्ट्राच मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची. महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु आहेत. महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे, अशी टीका त्यांनी कंगनाचं नाव न घेता केली होती.”

यावर कंगना रनौत ने पुन्हा ट्विटर युद्ध सुरू करत ट्विट द्वारे पुन्हा आपला द्वेष व्यक्त केला आहे, “राऊत यांनी मला हरमखोर म्हटले आहे, उद्धव यांनी मला नमक हराम म्हटले आहे, तसेच तुमच्या मुलीच्या वयाची असताना तुम्ही एका स्वयं-निर्वाहित मुलीशी बोलण्याची ही तुमची भाषा का, तुम्हाला लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री” असे यावेळी कंगना उत्तरली.

एव्हड्यावरच गप्प न बसता कंगना पुढे जाऊन, वडिलांच्या ताकत आणि पैशावर जगणारी मुलगी मी नाही, मी एका प्रसिद्ध कुटुंबातील आहे, मला त्यांच्या संपत्तीवर जगण्याची इच्छा नव्हती आणि कारण मला अनुकूलता स्वाभिमान आणि स्वत: ची किंमत मिळवणे जास्त महत्त्वाच वाटतं. तसेच कंगणाने मुख्यमंत्री यांना सरळ सरळ नेपोटीझम चा उत्पादक म्हंटले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments