आपलं शहर

लोकल प्रवेशाने डबेवाल्यांच्या समस्या सुटतील? जाणून घेऊया डबेवाल्यांच्या व्यथा आणि कथा!

डी,ऊन, वारा, असो की पाऊस सायकल हातगाडी किंवा मुंबई लोकलमधून मुंबईकरांना न चुकता वेळेवर आणि योग्य ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने डबा पोहचवन्याचे काम मुंबईचे डबेवाले करत असतात. परंतु हेच डबेवाले 6 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे घरी बसले आहेत. अखेर अनलॉक 5 च्या प्रक्रियेतुन हॉटेल, रेस्टॉरंट, बार यासह मुंबईची वेगळी ओळख असणारा मुंबईचा डबेवाले यांना देखील रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. परंतु अजून एकही डबेवाल्याला क्यूआर कोडचे ओळख पत्र प्राप्त झाले नसल्याने त्यांच्यात असंतोशाचे वातावरण निर्माण झाले आहे.

क्यूआर कोड प्राप्त झाला नसल्यामुळे आम्हाला प्रवेश मिळेल की नाही याबाबत माहिती नाही तर आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की लवकरच क्यूआर कोड मिळेल पण आमची अशी मागणी आहे की ओळख पत्राद्वारे आम्हाला प्रवेश द्यावा कारण क्यूआर कोड साठी अँड्रॉइड मोबाईल आवश्यक आहे आणि तो अनेक जणांजवळ उपलब्ध नाही. – सुभाष तळेकर, डबेवाले

आर्थिक डबघाईला आलेला डबेवाला थोड्या प्रमाणात तरेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. देश आणि मुंबई लॉकडाऊन झाली तेव्हा पासून प्रामाणिक आणि शिस्तबद्ध ओळख असणारा डबेवाला देखील थांबला. गेले 6 ते 7 महिन्यापासून डबेवाल्यांची सेवा थांबली आणि त्यांच्या समस्यांना तेव्हा पासून खरी सुरवात झाली. लॉकडाऊन झाल तेव्हा पासून मुंबईतील कार्यालय बंद असल्याने मुंबईचा डबेवाला थांबला आणि त्याच क्षणी निर्णय घेऊन हेच डबेवाले आपापल्या गावी परतले कारण मुंबईत राहून आपलं पोट भरुन शक्य नव्हतं काहि जन तर मुंबईतच छोट्या मोठ्या दुकानात काम करायला लागले. अखेर उद्या पासून लोकलसेवा सेवा मुंबईच्या डबेवाल्याना मिळत असली तरी केवळ लोकल सेवा मिळून त्यांच्या समस्या सुटणार नाहीत तर त्यांच्या समोर समस्यांचा डोंगर अजून उभाच आहे. सहा महिन्यांपासून ज्या वरून डबे पोहचवले जातात त्या सायकली अक्षरशः गंजल्या असून त्यांना रिपीयर करण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न उपस्थित आहे.

आम्हाला मुंबई लोकलमध्ये उद्यापासून प्रवेश दिला जाणार आहे आम्ही संपूर्ण पणे तयार आहोत पण गेल्या 7 महिन्याची घडी बसवायला आम्हाला थोडा वेळ लागणार आहे. आमच्या सायकली गंजल्या असून त्यांना रिपीयर करून चालवणं हे मोठं लक्ष आमच्यासमोर असणार आहे तर, आम्हाला आमचे ग्राहक पुन्हा मिळतील की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे कारण इमारती सील आहेत आणि त्यामध्ये आम्हाला प्रवेश दिला नाही तर आमचा व्यवसाय व्यवस्थित चालणार नाही. आम्ही राज्यसरकरकडे वेळोवेळी मागणी केली की आम्हाला जीवनावश्यक मध्ये सामील करावे परंतु असे केले गेले नाही. गावाला गेलेले डबेवाले केव्हा परत येतील याबाबत माहिती नाही तर आम्हाला मिळणाऱ्या अनेक योजनांचा लाभ आम्हाला न मिळता दुसरेच घेतात, अनेक जण आमच्या नावाखाली पैसे कमवत आहेत.

– विष्णू काळडुके, प्रवक्ते मुंबई डबेवाला असोसिएशन

लोकलसेवा डबेवाल्यांना देऊन समस्या सुटणार नसून गेल्या सहा महिन्यात अनेक डबेवाले गावाला गेले आहेत त्यांच्याकडे आता मुंबईत येण्यासाठी देखील पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत. मुंबईत अणेक जण डबेवाल्यांच्या नावाखाली जनतेची लूट करत आहेत हीच सर्वात मोठी समस्या आहे. मुंबईत अनलॉक सुरू झाले असले तरी अनेक सोसायटी आणि कार्यालये प्रतिबंध क्षेत्रात सील आहेत. महत्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात इमारतीमधूनच अधिक डबे घेऊन लोकांपर्यंत पोहचवले जातात. इमारतीच्या आवारात आम्हाला प्रवेश देतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तर नवीन ग्राहक जोडण्याचे मोठे उद्धिष्ट डबेवाल्यांवर असेल. अनेक संकटांचा सामना करून विस्कटलेल्या संसाराची घडी डबेवाल्याना बसवायची आहे. आणि यासाठी ते राज्यसरकारच्या मदतीच्या अपेक्षित आहेत. राज्य सरकार मदत करत की नाही की पुन्हा डबेवाले आपल्याच पायावर उभे राहतात हे पाहणं महत्वाचं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments