आपलं शहर

मुंबईत कचरा वाढल्यास टेंशन नाही, बीएमसीचा मास्टर प्लॅन तयार….

मुंबईसमोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे इथली वाढत जाणारी लोकसंख्या. एखाद्या भागात जितकी लोकसंख्या वाढत जाते, तितकाच तिथल्या भौगोलिक गोष्टींवर ताण निर्माण होत असतो. त्याचच एक उदाहरण म्हणजे मुंबईत आज घडीला दरडोई 5 हजार मॅट्रिक टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याची मुंबईच्या तीन ठिकाणी विल्हेवाट लावली जाते, मात्र तरीही मुंबई महानगरपालिकेसमोर वाढत्या कचऱ्याचे संकट असतेच, याच्यावर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने एक नवा उपाय शोधून काढला आहे.

मुंबईच्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प काही दिवसात उभे राहाणार आहे, तसाप्रकारची ग्रीन सिग्नल स्थायी समितीने दिला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या बैठकीत वीजनिर्मिती संदर्भात प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मुंबईत वाढत चालेल्या कचऱ्यावर उयार मिळाला आहे.

मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची जरी विल्हेवाट लावली जात होती, तरी विल्हेवाट लावत असताना मोठ्याप्रमाणे प्रदुषण होत होते. मुंबईतील कचरा आणि प्रदुषण कमी व्हावं, यासाठीच पालिकेकडून हा प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. या प्रकल्पाला तब्बल 1 हजार कोटी इतका खर्च येणार असल्याचा प्रस्तावही स्थायी समितीत मांडण्यात आलं होतं. 1 हजार कोटी रुपये खर्चून 25 मेगाव्हॅट वीजनिर्मिती केली जाणार असल्याचंदेखील पालिकेकडून म्हटले जात आहे.

हा वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव 2018 मध्येच मांडला होता. मात्र या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार असल्याचं सांगत शिवसेनेच विरोध केला होता. मात्र 2 वर्षांनी आता पुन्हा एकदा मंजुरीसाठी आला आहे, आणि त्यावर स्थायी समितीने मंजूरी दिली आहे.

Rajesh Tope | हिवाळा आलाय, राज्य टास्क फोर्स आणि डेथ ऑडिट कमिटीने दिला इशारा

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments