आपलं शहर

मुंबईत ‘मराठा जोडो’ आंदोलनाला वेग…

गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने चांगलच वळण घेतलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मुंबईच्या लालबाग परिसरातून ‘मराठा जोडो आंदोलन’ सुरु केले जात आहे. मुंबईच्या सेंट्रल लाईनपासून सुरु झालेले हे आंदोलन आज (रविवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी) वेस्टर्न लाईनवर केले जात आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार योग्य भूमिका मांडत नाही. आरक्षणाबाबत टाळाटाळ केली जात आहे. याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. आज मुंबईत मराठा समाजाच्या वतीने संघर्ष यात्रेचे आयोजन केलेला आहे. ही संघर्ष यात्रा लालबागपासून टप्प्याटप्प्याने पुढे संध्याकाळी ठाण्यापर्यंत जाणार आहे. सरकार विरोधात पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ झाली, तर मराठा समाज एकवटला पाहिजे, यासाठी मराठा ‘जोडो आंदोलन’ आणि संघर्ष यात्रेचे आयोजन आज करण्यात आले आहे.

“राज्य सरकारने मराठा आंदोलनाच्या संदर्भात खेळ मांडला असून या सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन” घेत असल्याची भूमिका ‘मराठा क्रांती मोर्चा महामुंबई’कडून व्यक्त करण्यात आलेली आहे.

 

मराठा आरक्षणाचा कायदा समंत झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात अपिल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या विषयाला तुर्तास स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा असंतोषाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक ठिकाणी आरक्षणाला घेऊन अनेक समन्वयक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील सर्व मराठा समाजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने महामुंबईत ‘मराठा जोडो’ आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments