आपलं शहर

फायनल सामना जिंकताच मुंबई झाली मालामाल

 

आय पी एल टी-20 मध्ये दिल्लीवर दमदार विजय मिळवत लाखो चाहत्यांना मुंबई इंडियन्सने दिवाळी बोनस दिला. फायनल मध्ये कडाडून गेम खेळत अखेर मुंबई इंडियन्सने आय पी एल ची ट्रॉफी आपल्या नावे केली. या आधी मुंबई इंडियन्स 2013, 2015, 2017,2019 मध्ये फायनल मारली होती. पाचव्यांदा विजयी होत मुंबई इंडियन्स टीमने आपली एक वेगळीकता दाखवून दिली.

सुरुवातीपासून मुंबईने आपले खेळकौशल्य अगदी दमदारपणे निभावले. मध्ये कॅप्टन रोहित शर्मा यांच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स थोडासा खवलेला पहायला मिळाला पण नंतर जबरदस्त कमबॅक करत शेवटी मुंबईने फायनची बाजी मारली. आय पी एल 2020 पूर्वी कोरोना संकटाच्या अभावी बीसीसीआयने विजेते बक्षीस रक्कम 50 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 2019 मध्ये मुंबई इंडियन्सनं जेतेपद पटकावत 20 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळवली होती. परुंतु या वर्षी विजेत्याला 10 कोटी, उपविजेत्याला 6.25 आणि क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी 4.375 कोटी देण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर बीसीसीआयने निर्णय बदलत मागील वर्षी बक्षीस रक्कम म्हणून 32.5 कोटी खर्च केले होते. त्यानुसार विजेत्या संघाला 20 व उपविजेत्याला 12.5 कोटी दिले होते. तेवढीच रक्कम बीसीसीआयने या वर्षी दिली आहे.

आय पी एल 2020 बक्षीस रकमेची संपूर्ण यादी :

● मुंबई इंडियन्स – 20 कोटी
● दिल्ली कॅपिटल्स – 12.5 कोटी
● सनरायझर्स हैदराबाद – 8.78 कोटी
● रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 8.78 कोटी

तसेच आय पी एल 2020 मध्ये ट्रेंट बोल्ट याला फायनलमधील मॅन ऑफ दी मॅचची पदवी मिळाली, यासाठी त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. ऑरेंज कॅपचे दावेदार ठरले लोकेश राहुल, त्यांना 10 लाख रुपये बक्षीस मिळाले. कागिसो रबाडा यांना पर्पल कॅप कॅप मिळली व 10 लाख रुपये बक्षीस मिळाले.

एमेर्जिंग प्लेअर म्हणून देवदत्त पडीक्कल, मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर म्हणून जोफ्रा आर्चर, सुपर स्ट्रायकर म्हणून किरॉन पोलार्ड, गेम चेंजर म्हणून लोकेश राहुल, पावर प्लेअर म्हणून ट्रेंट बोल्ट व सिसेक्स ऑफ सिझन म्हणून इशान किशन यांना बीसीसीआय तर्फे 10 लाख रुपये बक्षीस मिळाले.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments