फेमस

हा पत्रकारांचा मुद्दा नाहीच, तर मराठी माणसांचा मुद्दा…

पत्रकार अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात महाराष्ट्र सरकार विरुध्द भाजप असा वाद रंगताना दिसत आहे. अर्णव गोस्वामींच्या बाजूने भाजपकडून निदर्शने केली जात आहेत, तर महाविकास आघाडीकडून नेहमी कायद्या विजय होतो, अशाप्रकारे मत मांडलं जात आहे. त्यात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हा मुद्दा पत्रकारांचा नसून तर मराठी माणसाच्या हक्काचा आहे, असं ठाम मत शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. काही वर्षांपूर्वी अर्णव गोस्वामी आणि इतर दोघांच्या नावे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेल्या अन्वय नाईकला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे, असं मत संजय राऊत यांनी मांडलं आहे.

ज्यावेळेला एक अभिनेता कोणतीही सुसाईड नोट न लिहितादेखील आत्महत्या करतो, आणि त्यावेळेस अनेकांवर बिनबुडाचे आरोप केले जातात, ते देशातील केंद्र सरकारला चालतं का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला आहे, तर दुसरीकडे सुसाईड नोटमध्ये ठळकपणे नाव असूनही जर एखादी केस दाबली जाते, हे भाजपला चालतं का असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

उद्या कोणीतरी उठेल आणि घरातल्या जेवनात मीठ कमी आहे, म्हणून कोणीतरी राष्ट्रपती राजवट लावा म्हणेल, असं चालेल का, असा सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. देशात राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना पूर्णपणे हलकं केलं असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
2018 च्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामींना अटक केली आहे. 2018 मध्ये, गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीद्वारे थकबाकी न भरल्यामुळे एका आर्किटेक्ट आणि त्याच्या सासूने आत्महत्या केल्याचा आरोप गोस्वामींवर आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्याची आई कुमुद नाईक यांच्यासह 05 मे 2018 मध्ये अलिबाग येथील त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळले होते. त्यावेळेस पोलिसांनी सादर केलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार गळा अन्वयचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याच उल्लेख त्यावेळी केला जात होता. आत्महत्येच्या ठिकाणी अन्वयने लिहलेली एक सुसाईड नोटदेखील पोलिसांच्या हाती लागली होती, त्यात त्याने स्वत:च्या आत्महत्येचं कारणही स्पष्टपणे नमुद केलं होत. ज्याच अर्णव गोस्वामीसह आणखी दोघांच्या नावाचा उल्लेख होता.

(This suicide case has no links to the cases Arnab Goswami faces in connection with Mumbai Police. A team from Mumbai police went to his residence on Wednesday morning to assist the Maharashtra Police.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments