फेमस

‘या’ कारणामुळे अर्णव गोस्वामीला अटक

 

“पुछता है भारत” चे बहुचर्चित रिपब्लिकन टीव्ही चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सकाळी 8 वाजता वरळी स्थित राहत्या घरी रायगड पोलिसांनी अटक केली. सर्वांना वाटलं की बहिचर्चित टी आर पी घोटाळ्यामध्ये अर्णब गोस्वामीला अटक झाली असावी परंतु 2018 साली सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येमुळे अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.

कोणत्या कारणास्तव अर्णब यांना झाली अटक ?

5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर अन्वय नाईक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी आता ही हायप्रोफाईल केस झाल्यामुळे त्यांनी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी सुरू केली होती.

अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरीकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले आणि त्यांनी आत्महत्या केली असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments