फेमस

दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव; विकत घेण्यास लोकांची झुंबड!

दाऊद इब्राहिम कासकर. 1993 मधल्या मुंबईच्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद हा मुळचा कोकणातला. रत्नागिरी जिल्ह्याील मुंबके, हे त्याचं गाव. या गावात दाऊदच्या नावे गडगंज संपत्ती आहे.

दरमहिना दाऊदचं नाव कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असतेच. आज त्याचे नाव आणखी एका कारणाने चर्चेचा विषय बनले आहे. ते म्हणजे त्याच्या संपत्तीमुळे. येत्या 10 नोव्हेंबर 2020 रोजी दाऊदच्या मालमत्तेचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार आहे. सरकारकडून त्या संदर्भातील हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र इथल्या गावकऱ्यांचं काही वेगळंच म्हणणं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावात दाऊद इब्राहिमचा 4 हजार स्क्वेअर फूटांचा बंगला आहे. याच ठिकाणी 3 जमिनी आहेत. या प्रॉपर्टीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दाऊदच्या 7 जागांचा लिलाव 10 नोव्हेंबर रोजी होतोय; पण हा लिलाव होत असताना मुंबकेमधील ग्रामस्थांनी ही जमीन गावातल्या गरजू शेतकऱ्यांना कसण्यासाठी मिळावी, अशी मागणी केली आहे.

याआधी दोनवेळा दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव जाहीर झाला होता, परंतु खरेदीसाठी कोणीही पुढे आले नसल्याने आता तिसऱ्यांदा हा लिलाव होणार आहे. गावातील संपूर्ण प्रॉपर्टी दाऊद ची आई अमिना कासकर यांच्या नावे आहे. आईवडील दोघेही हयात नसल्याने दाऊदचे काका त्या जमिनीचा सांभाळ करत आहेत. वडिलोपार्जित मालमत्ता दाऊदचे काका कसत आहेत; पण जर लिलाव करत असाल तर सरकारच्या नियमांप्रमाणे लिलाव व्हावा, आमची काहीही अडचण नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दाऊदच्या मालमत्तेच्या लिलाव हा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. याआधी ती मालमत्ता कोणी विकत घेतली नाही, मात्र आता तीच मालमत्ता विकत घेण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली असल्याचेदेखील समजले जाते. त्यामुळे दाऊदच्या प्रॉपर्टीचा लिलाव कोण घेणा, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबईच्या दाऊदला पाकिस्तान का बाळगतय? पाहा; दाऊदचा मुंबई पॅटर्न…

कोरोनामुळे पुन्हा चर्चेत येणाऱ्या दाऊद इब्राहिमचा ‘हा’ इतिहास तुम्हाला माहितीच नाही…

हे होते मुंबईते ‘टॉप 10’ डॉन; सहावा तर ड्रायव्हरचे काम करून करायचा गुन्हेगारी…

Kishori Pednekar | कांजुरमधील कारशेडचे काम थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून पत्र – किशोरी पेडणेकर

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments