कारण

कोरोनापासून दिल्ली हारली, मुंबई सावरली; यामागची पाच मोठी कारणे…

सध्या हिवाळा सुरु आहे, त्यातच अनेक सण साजरे केले जात आहेत. या सगळ्यांबरोबर प्रत्येक राज्य सरकार त्या त्या राज्यात अनलॉकच्या माध्यमातून अनेक गोष्टी नव्याने सुरु करत आहे. याचेच परिणाम म्हणून दिल्लीसारख्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली आहे.

दिल्लीत कोरोनाची रुग्ण संख्या वाढताच त्याची कारणे शोधण्यासाठी ‘इंडिया टुडे’ने मुंबई आणि दिल्लीच्या कोरोना परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासातून दिल्ली आणि मुंबईमध्ये नेमका काय फरक आहे, हे मांडण्याचा प्रयत्न केलाय.

दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची पाच मुख्ये कारणे

मुंबईच्या तुलनेत दिल्लीत कोरोना रुग्ण वाढण्याची पाच मुख्य कारणे इंडिया टूडेच्या सर्वेमध्ये नमूद केली आहेत. मुंबईतील कोरोना परिस्थितीवर अत्यंत सुयोनियोजितपणे नियंत्रण आणल्याचं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे, तर दिल्लीत राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचंही म्हटलं आहे.

अनेक सण-उत्सव साजरे करण्यासाठी सरकारने दिलेली परवानगी, अनेक धार्मिक कार्यक्रम तसेच सणांमध्ये झालेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टींना दिलेली सवलत, रुग्णांच्या तुलनेत कोव्हिड सेंटरची कमतरता आणि सरकार मार्फत राबवण्यात येणाऱ्या मोहिमांची अंमलबजावणी या मुख्य कारणांमुळे दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र समोर आले आहे.

नागरिकांचा निष्काळजीपणा कोणता?
  • सतत हात धुने आणि तोंडावर मास्क लावणे या काळात खूप गरजेचे असतानाही हिवाळ्यामध्ये अनेक नागरिक सतत हात धूत नाहीत, किंवा सॅनिटायझरचा वापर करत नाहीत, सोबतच अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो.
  • आपण एका ठिकाणी वापरलेले कपडे स्वच्छ न करता, दुसऱ्या ठिकाणी वापरणे किंवा कपडे बदलण्याचे टाळणे, यामुळे संसर्गात वाढ होण्याची शक्यता असते.
  • गरज नसतानाही गर्दी निर्माण करणे, किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे.
  • भावनांच्या आहारी जाऊन सर्व नागरिक एकत्र येत सण साजरे हे कोरोना वाढीसाठी मुख्य कारण ठरले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments