एकदम जुनं

वाशी खाडीवरील पुलाची कल्पना आलेले ‘हे’ मुख्यमंत्री तुम्हाला ठाऊक आहेत का ?

 

आपल्या मुंबईला उभे करण्यामध्ये अगिणत महापुरुषांचे योगदान आहे. मुंबई आपली देशाची तसेच महाराष्ट्राची राजधानी असून जवळपास 12 कोटींपेक्षा अधिक लोक वेगवेगळ्या राज्यांतून मुंबईत स्थित आहेत.

मुंबईत लोकांची संख्या वाढली मग विकास कामांची संख्या वाढली. मुंबईला महामुंबई, नवी मुंबई अशी प्रगतशील शहरे जोडली गेली. हळूहळू शहरीकरण वाढले. नवी मुंबई, महामुंबई मधील लोक मुंबईत कामसाठी जाऊ लागले. त्यांच्या प्रवासासाठी म्हणजे नवी मुंबईला मुंबईशी जोडणारा वाशी खाडी पूल बांधण्यात आल; पण आता काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वाशी खाडी पुलाची कल्पना खरे पाहता 1962 ते 1967 या कालावधीतचं एका महापुरुष, स्वातंत्र्य लढवये यांना आली होती. पाहुयात या बद्दल सविस्तर माहिती!

काळ होता 1962 ते 19667 म्हणजे स्वतंत्र राज्याच्या दुसऱ्या विधानसभेचा. निवडणूका झाल्या आणि त्यावेळी काँग्रेसचे राज्यावर नेतृत्व होते. कालांतराने निवडणूक झाल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. भारत-चीन युद्धाच्या दरम्यान देशातून अनेक लोक मदतीला धावले. त्यावेळी महाराष्ट्रातून मुंबई शहराने सर्वाधिक सोने व इतर मदत गोळा केली. ही मदत गोळा करण्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात कार्य केलेले धुरंधर राजकारणी, साहित्यिक आणि प्रवाभी वक्ते यांच्यासोबत हाडाचे पत्रकार असलेल्या मारोतराव कन्नमवार त्यांचे योगदान अनमोल ठरले. यांनी जमा करून दिलेल्या योगदानामुळे संरक्षण निधीसाठी तब्बल 7 कोटी 91 लाख 55 रुपयांची मदत झाली.

बुद्धिमान आणि राजकारणातील जाण असलेले मारोतराव हे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या जवळचे असल्याने त्यांच्या कौशल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी काँग्रेसने त्यांच्यावर सोपवली. आणि विकासकामे करताना त्यांना मुंबईला जोडणारा वाशीच्या खाडी पुलाची कल्पना मारोतराव यांना पहिल्यांदा आली. त्यानंतर वाशी खाडी पुलाची निर्मीती झाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments