आपलं शहर

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची ही नियमावली तुम्हाला माहित आहे ?

 

फटाक्यांची आतेशबाजी, दिव्यांचा प्रकाश आणि आनंदाने लखलखीत करणारा सण म्हणजे दिवाळी. पुढील अवघ्या काही दिवसात दीपावली सण येत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सण उत्सवात योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संकटाची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे मुंबई महापालिकेने सण साजरा करताना खबरदारी म्हणून काही नियमावली तयार केली आहे.

● बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडण्यास आतशबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

● केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलझडी, अनार फोडण्यास अनुमती देण्यात आली आहे.

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सजगतेने व सतर्क राहून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

● कोरोना बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते; ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.

● हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत.

● वरील बाबत नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.

● सर्वांनी सुयोग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

● यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करावयाची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावे.

● दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या, नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे वा दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) द्याव्यात.

● भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments