आपलं शहर

मुंबई पाठोपाठ या शहरांनी घेतला शाळा न सुरू करण्याचा निर्णय !

 

येत्या सोमवार (23 नोव्हेंबर) पासून राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा धाडसी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु, एकूणच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पाहता तसेच देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाता, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनांची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या.

आता सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी, सरकारी तसेच महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याच्या सूचना ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच पनवेल महापालिकेतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी अनिवार्य केली होती त्यामुळे साहजिकच कोरोना चाचणी केंद्रावर शिक्षकांची झुंबळ ही उडणार होती पण यावर मुंबई, ठाणे तसेच पनवेल विभागाने शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी पालक, विद्यार्थी तसेच शिक्षणाची संभ्रमता स्पष्ट झाली आहे.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments