आपलं शहर

मुंबईतल्या ‘या’ 244 ठिकाणी होतेय कोरोनाची मोफत चाचणी…

अनलॉक होत असलेल्या मुंबईत या बातमीची गरज आहे. कारण जरी मुंबई अनलॉक होत असलं, तरी अजूनही इथल्या कोरोना संक्रमणाचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. कोरोनावर अधिकाअधिक नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकादेखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे.

जितक्या जास्त कोरोना संदर्भातल्या चाचण्या होतील, तितके जास्त रुग्ण समोर येतील आणि कोरोनाचे संक्रमण कमी होईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी प्रकारच्या एकूण 244 ठिकाणी आजपासून (2 नोव्हेंबर) मोफत कोरोना वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोरोनासंदर्भातल्या चाचण्यांसाठी कोणत्याही खासगी रुग्णालयात जाण्याची गरज नाही, सोबतच मोठी रक्कम मोजण्याचीही गरज नाही.

पालिकेच्या 24 विभागांमध्ये 244 ठिकाणी कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सर्व पत्त्यांची यादी तुम्हाला तुमच्या विभागनिहाय नियंत्रण कक्षाद्वारे मिळू शकते. किंवा पालिकेतील नियंत्रण कक्षाच्या 1916 या क्रमांकावरही ही माहिती मिळू शकते.

सुरुवातीच्या काळात रोज सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान या चाचण्या केल्या जाणार आहेत. यात वॉक इन, पद्धतीने चाचण्या केल्या जाणार आहेत, काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीने तर बाकीच्या ठिकाणी अँटीजन टेस्टचाही वापर केला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला खासगी रुग्णालयात टेस्टिंग करून घ्यायच्या असतील तर सुधारित शासकीय नियमावलीही लागू करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घरी येऊन चाचणी केल्यास 1800 रुपये तर नागरिकांनी प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करून घेतल्यास 1400 रुपये प्रतिचाचणी असे दर आकारण्यात येणार आहेत.

(अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करा…)

(The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) will kick-start free COVID-19 tests at 244 locations, including the civic body-run clinics and hospitals, from Monday.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments