कारण

आपल्या पैशांतून राज्यपाल भेटीस आलेल्यांचा कसा करतात पाहुणचार आणि किती होतो खर्च ?

 

सप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या ठिकाणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोशारी यांची नेमणूक करण्यात आली. जेव्हा पासून राज्यपाल म्हणून भगत सिंग यांची निवड झाली आहे तेव्हा पासून ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेचा विषय ठरले आहेत. सुरवातीला पहाटे शपथविधी असो अथवा हिंदुत्वाचा मुद्दा या सर्व मुद्यांवरून राज्यपाल आणि सरकार यांच्यात आपण वाद पाहत आहोत. राज्यपाल हे भाजपला झुकते माप देतात अस सरकार वेळोवेळी वक्तव्य करताना आपण पाहत आहोत. मुख्यतः कोणीही उठतो आणि राज्यपालांना भेटतो या संदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मिम्स व्हायरल होताना आपण पाहिले. पण मुख्य म्हणजे राज्यपालांची भेट घेणार्यांना न्याय मिळतो का किंवा राज्यपालांना जो माणूस आपलं शिष्टमंडळ घेऊन भेटतो त्याला महामनिय राज्यपाल चाय पाणी तरी विचारतात का असा प्रश्न पडला असताना आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आतापर्यंत अनेक राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रातील व्यक्ती माननीय राज्यपाल यांची भेट घेण्यास येतात. ते भल्यामोठ्या राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतात. त्यावेळी राज्यपाल किंवा तेथील कर्मचारी हे त्यांना चाय तरी देतात का? आपला भारत देश हा अनेक संस्कृती आणि परंपरने नटलेला आहे एखादा पाहुणा जर आला आपण जेवण नाही तरी चाय पाणी देतोच. राज्यपाल हे राज्यातील मुख्य व्यक्ती मग त्यांच्या दालनात भेटीला आलेल्या लोकांना चाय देतात का?

आज राज्यपालांच्या भवणाकडे जाण्याचा योग आला केवळ भाजपच्या अध्यात्मिक आघाडीमुळे. मंदिरे उघडण्याच्या मागणीकरिता दोन मोठी आंदोलने करुन सुद्धा कोणताही निर्णय न घेतल्याने आध्यात्मिक समन्वय आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन वेळा पत्रे पाठऊन साधु-संतांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ मागितली होती आणि दि. 27 ऑक्टोबर पर्यंत मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीची वेळही दिली नाही तसेच मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील घेतला नाही. त्यामुळे आज आचार्य तुषार भोसले यांची आणि राज्यपालांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा योग आला राजभवनावर जाण्याचा.

तुषार भोसले यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून आलं आणि त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली हे सर्व होत असताना एक महंत यांना, वंटास मुंबईने विचारलं असता ,राज्यपालांची भेट घेतलीत कसा अनुभव होता आणि राज्यपाल चाय पाणी काही ऑफर करतात का? यावर महंत हसले आणि बोलले ऑफर केली होती. त्यानंतर मला दुसरा प्रश्न पडला की मग आतापर्यंत राज्यपालांना अनेक जण भेट घेतात तर त्या सर्वांच्या चाय पाण्याचा खर्च किती होत असेल? कारण हा सर्व खर्च साहजिकच राज्यशासनाच्या तिजोरीत पडत असतो. राज्यपाल यांनी कार्यभार हाती घेतलाय तेव्हा पासून अनेक जनांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सहज प्रश्न पडला आतापर्यंत किती खर्च झाला असेल ओ?

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments