आपलं शहर

ठरलं तर, बोनस मिळणार ! पण मागील वर्षीपेक्षा फक्त 500 रुपये जास्त ?

 

गुड न्यूज ! गुड न्यूज ! पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज !दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कामगारांचा बोनस जाहीर केला. त्यामुळे आता मुंबई महापालिका कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात महापालिका आर्थिक परिस्थितीत डबघाईला आली असताना देखील पालिकेने अविरत सेवा देणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या दिवशी बोनसचा लाडू भेट स्वरूपात दिला आहे. मागील दिवसात म्युनिसिपल युनियनकडून वर्षातील उत्पन्नाच्या 20% तर म्युनिसिपल मजदूर संघाकडून 50 हजार रुपये बोनसची मागणी करण्यात आली होती. यावर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैठक घेऊन तोडगा काढला आणि महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून यंदा १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे. करोनाच्या संकटामुळं मागील वर्षीपेक्षा यंदा ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

पाहुयात पालिका कर्मचाऱ्यांना कामानुसार किती मिळणार बोनस ;

● अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी : 7750 रुपये बोनस

● महापालिका कामगार : 15 हजार 500 रुपये बोनस

● शिक्षण खात्यात मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक : 4700 रुपये बोनस

● अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण  सेवक : 2350 रुपये बोनस

● सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी : 4400 रुपये बोनस

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments