आपलं शहर

केंद्र सरकारने कांजूरमार्ग मेट्रो कार शेडचा प्रकल्प थांबवला…

मेट्रो – 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) कार शेडसाठी परवानगी नाकारत मुंबईच्या कांजूरमार्ग येथील जमीन हस्तांतरणावर केंद्राने आक्षेप घेतला आहे. 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात (Department for Promotion of Industry and Internal Trade) उद्योग अंतर्गत व्यापार विभागाच्या मते कांजूरमार्गयेथील 102 एकर जमीन योग्य प्रक्रिया न पाळल्यामुळे केंद्राने ताब्यात घेतल्याचे केंद्राकडून आलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरेकडून कांजूरमार्ग येथे शेड हलविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर ही जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) देण्यात आली होती. एमएमआरडीएने (Mumbai Metropolitan Region Development Authority) मेट्रो – 6 (स्वामी समर्थ नगर – विक्रोळी) च्या जागेचे हस्तांतरण करण्यास सांगितले होते, परंतु या प्रकरणाची प्रक्रिया सुरु असून डीपीआयआयटीने (Department for Promotion of Industry and Internal Trade) याबाबत एमएमआरडीएलाच संयुक्त सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे, असे केंद्राकडून आलेल्या पत्रात म्हटले आहे.

संयुक्त सर्वेक्षण होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमीन हस्तांतरण झाल्यानंतर एमएमआरडीए, डीएमआरसीएल [Delhi Metro Rail Corporation Lsimited] च्या अधिकार्यांनी या जमिनीवरील माती परीक्षण सुरू केले,” असे या पत्रात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीए यांच्या “अयोग्य, एकतर्फी कामकाजामुळे डीपीआयआयटीचे गंभीर नुकसान झाले असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई पालिकेकडून सुरु असलेल्या कामाला सध्यातरी पुर्णविराम बसल्याचे म्हटले जात आहे.

(In a letter dated October 15 to Maharashtra chief secretary, the Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) said the 102-acre land has been handed over also without following due procedure)

Kishori Pednekar | कांजुरमधील कारशेडचे काम थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून पत्र – किशोरी पेडणेकर

Ashish Shelar | ठाकरे सरकारची लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे अशी कार्यपद्धती – आशिष शेलार

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments